कुचीभोतला यांच्या पत्नीला अमेरिकेचा तात्पुरता व्हिसा

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

वॉशिंग्टन: वंशद्वेषाच्या कारणावरून हत्या झालेल्या श्रीनिवास कुचीभोतला या अनिवासी भारतीयाच्या पत्नीला अमेरिकेत तात्पुरता नोकरी व्हिसा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वॉशिंग्टन: वंशद्वेषाच्या कारणावरून हत्या झालेल्या श्रीनिवास कुचीभोतला या अनिवासी भारतीयाच्या पत्नीला अमेरिकेत तात्पुरता नोकरी व्हिसा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

इंजिनिअर श्रीनिवास यांची फेब्रुवारी महिन्यात कन्सासमधील एका बारमध्ये हत्या झाली होती. ही हत्या वंशद्वेषाच्या कारणावरून झाल्याचा संशय असून, या हत्येनंतर त्यांच्या पत्नी सुनैना दुमाला यांचा तेथे राहण्याचा अधिकार आपोआप संपुष्टात आला होता. श्रीनिवास यांच्यासोबतचा विवाह हाच सुनैना यांच्या अमेरिकेतील वास्तव्याचा मुख्य आधार होता. मात्र हा हक्क त्यांना नोकरी व्हिसामार्फत पुन्हा मिळाला असून, यासाठी त्यांना प्रभावी कॉंग्रेस सदस्य केविन योडर यांनी मदत केली.

सुनैना यांच्यासोबत असे काही घडू नये, हा आमचा प्रयत्न होता. त्यांनी त्यांचा पती गमावणे, ही माझ्यासाठी अपमानास्पद बाब असून, त्या खूप दुःखद प्रसंगातून गेल्या आहेत. कोठेतरी त्यांना दिलासा मिळवून देण्याचा प्रयत्न मी केला. अशी प्रतिक्रिया योडर यांनी व्यक्त केली. याबद्दल सुनैना यांनी योडर यांचे आभार मानत, माझ्यासारख्या अनेकांना अशा प्रकारची मदत हवी असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: washington news Kuchibhotla's wife is a temporary visa of the USA