सद्यःस्थितीमुळे 'पाक'ला मदत नाकारली: जीम मॅटीस

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जुलै 2017

वॉशिंग्टन: पाकिस्तानला मदत नाकारण्याचा निर्णय हा अमेरिकेच्या पाकिस्तानविरोधी धोरणाचा भाग नसून, तेथील वास्तव व सद्यःस्थितीमुळे तो घेण्यात आल्याचे सुरक्षा विभागाचे सचीव जीम मॅटीस यांनी आज स्पष्ट केले.

वॉशिंग्टन: पाकिस्तानला मदत नाकारण्याचा निर्णय हा अमेरिकेच्या पाकिस्तानविरोधी धोरणाचा भाग नसून, तेथील वास्तव व सद्यःस्थितीमुळे तो घेण्यात आल्याचे सुरक्षा विभागाचे सचीव जीम मॅटीस यांनी आज स्पष्ट केले.

दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानला दिली जाणारी 35 कोटी अमेरिकी डॉलरची मदत रोखण्याचा निर्णय काल (ता.21) अमेरिकेने जाहीर केला होता. मात्र या निर्णयाचा अमेरिकेच्या पाकिस्तानविरोधी धोरणाशी कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचे मॅटीस यांनी सांगितले. पाकने हक्कानी नेटवर्कविरोधात कारवाई केली नाही, हे तेथील वास्तव असून, त्यामुळेच आपण कॉंग्रेससमक्ष ही बाब प्रमाणित केली नाही, असेही मॅटीस यांनी नमूद केले.

या निर्णयामागे कोणते धोरण नसून, याला सद्यःस्थितीचे आकलन म्हणता येईल. आम्ही केवळ वास्तविकतेलाच अधोरेखित करतो आहोत. असेही मॅटीस यांनी नमूद केले. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅकमास्टर हे लवकरच या अनुषंगाने अफगाणिस्तानला भेट देणार असल्याची वृत्त मॅटीस यांनी फेटाळून लावले.

Web Title: washington news Pakistan denied help: James Mattis