ट्रम्प यांचा इराणला इशारा

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जानेवारी 2018

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवरील राग अद्याप कायम असून, त्या देशावर लादण्यात आलेल्या प्रतिबंधांवरील सुटीला आपण ही शेवटची मुदतवाढ देत आहोत, अशी घोषणा त्यांनी आज केली. अमेरिका आणि युरोपला आण्विक करारामधील घातक त्रुटींना दूर करता यावे, म्हणून आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराणवर लादण्यात आलेल्या निर्बंधांना 120 दिवसांसाठी ट्रम्प यांनी स्थगिती दिली आहे.

इराणवर कायमस्वरूपी आण्विक निर्बंध लादण्यासाठी युरोपीय महासंघांनीही संमती द्यावी, यासाठी व्हाइट हाउसचे प्रयत्न सुरू आहेत. इराणला शेवटची संधी देण्यासाठी ट्रम्प यांनी आर्थिक निर्बंध शिथिल केले आहेत. माझी प्रबळ इच्छा असतानाही अमेरिकेने इराणच्या आण्विक करारातून अद्याप पूर्ण माघार घेतलेली नाही, असे ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनामध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांनी याआधी आपल्या युरोपियन मित्रांना या कराराबाबत संयुक्त सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. मित्र देशांनी हे केले नाही तर अमेरिका या करारातून माघार घेईल, अशी धमकीच त्यांनी दिली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washington news Trumps Iran Warnings