ट्रम्प यांच्या भूमिकेचे भारताकडून स्वागत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

वॉशिंग्टन : पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिला जात असल्याबाबतच्या अमेरिकेच्या काळजीशी भारत सहमत असून, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अफगाणिस्तान आणि दक्षिण आशिया धोरणाला पाठींबा असल्याचे भारताने आज सांगितले.

ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांबाबतच्या धोरणावर सडकून टीका केली होती. दहशतवाद्यांना आश्रय दिल्यास परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना यांनी ट्रम्प यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. "दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिकेचे धोरण समान आहे. अफगाणिस्तानातही पाकिस्तान हिंसाचार घडवत असल्याने अमेरिकेला वाटत असलेल्या काळजीशी आम्ही सहमत आहोत,' असे सरना यांनी आज सांगितले. अमेरिकेचा "थिंक टॅंक' असणाऱ्या हवाई येथील ईस्ट-वेस्ट सेंटर येथे सरना यांनी आपल्या भाषणादरम्यान भारताची भूमिका मांडली. पाकिस्तानने आपल्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ देऊ नये, असे आवाहनही सरना यांनी या वेळी केले.

Web Title: washington news Welcoming Trump's Role to India