भारताची काळजी वाटत नाही- सोहेल अमन

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

इस्लामाबाद- पाकिस्तानी लष्कर सज्ज असल्यामुळे आम्हाला भारताची काळजी वाटत नाही, असे पाकिस्तानचे हवाईदल प्रमुख मार्शल सोहेल अमन यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे.

एका कार्यक्रमावेळी बोलताना अमन म्हणाले, 'भारत-पाकिस्तान सीमेवर भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सैनिक मारले गेले आहेत. आम्ही संयम दाखवत आहोत. पाकिस्तानी लष्कर सज्ज असून, आम्ही भारताला घाबरत नाही. काश्मीरचा विषय हा चर्चेतूनच सुटू शकतो.'

भारत-पाकिस्तान आतंरराष्ट्रीय सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. भारताने केलेल्या गोळीबारात पाकव्याप्त काश्मीरमधील 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, तीन सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. भारतीय सैनिक हे नागरिकांना लक्ष्य करत आहेत. गोळीबारात 21 जण जखमी झाले आहेत, असेही अमन म्हणाले.

Web Title: We are not worried about India, says Pakistan air chief