भारताबरोबर सर्व विषयांवर चर्चेस तयार : इम्रान खान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

इस्लामाबाद : भारताबरोबर सर्व विषयांवर चर्चेस तयार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. दहशतवादाला पाकिस्तानने दिलेले प्रोत्साहन हे हिताचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सीमेपलीकडून पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबवीत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही, या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य यांच्या विधानानंतर इम्रान यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

पाकिस्तानचा वापर दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यास आमची परवानगी नाही असे ते म्हणाले. इम्रान खान यांच्या सरकारला आज शंभर दिवस पूर्ण झाले, त्या वेळी ते भारतीय पत्रकारांशी बोलत होते. पाकिस्तानच्या नागरिकांना भारताबरोबर शांतता हवी आहे. पंतप्रधान मोदी यांना भेटून आणि चर्चा करून आपल्याला आनंद होईल. मी कोणत्याही विषयावर चर्चेस तयार आहे.

काश्‍मीर प्रश्‍न सोडविण्यासाठी सैन्य हा उपाय नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले, की कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही. लोकांची मानसिकता आता बदलली आहे. करतारपूर कॉरिडॉरचा शिलान्यास झाल्यानंतर एक दिवसाने इम्रान खान बोलत होते. या कॉरिडॉरच्या माध्यमातून आम्ही भारताबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करू इच्छित आहोत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We are ready to Discussions on all issues with India says Pakistan Prime Minister Imran Khan