रशियाचे पंतप्रधान म्हणतात, आमच्याकडे सर्वात सुंदर वेश्या

वृत्तसंस्था
Friday, 20 April 2018

पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आमच्याकडे जगातील सर्वात सुंदर वेश्या आहेत, असे सांगितले. याबाबतची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: दिली आहे.

मॉस्को : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. त्यादरम्यान पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आमच्याकडे जगातील सर्वात सुंदर वेश्या आहेत, असे सांगितले. याबाबतची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: दिली आहे.

putin and trump

अमेरिकेतील पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनिअलने डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तसेच याबाबतची वाच्यता कोठेही करू नये यासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आता रशियाचे पंतप्रधान पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आमच्याकडे जगातील सर्वात सुंदर वेश्या असल्याचे सांगितले, ही माहिती स्वत: ट्रम्प यांनी दिली आहे. पुतिन यांच्या विधानाने सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We Have Some Of The Most Beautiful Hookers In The World says Vladimir Putin To Trump