भारताकडून आमच्यावर हल्ला होऊ शकतो

पीटीआय
Friday, 8 May 2020

सध्याच्या काश्मीरमधील अस्वस्थतेमागे पाकिस्तान आहे असा आरोप भारताने केल्यानंतर इम्रान खान यांनी ट्विट केले असून यात त्यांनी “सध्या तणावग्रस्त परिस्थिती आहे. त्याचा फायदा घेत, घुसखोरी होत असल्याचा आरोप भारताकडून सातत्याने होत आहे. तसेच याच्या आडून भारत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

इस्लामाबाद - सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तानला जबाबदार धरत भारताकडून पाकिस्तानवर हल्ला होण्याची भीती असल्याचे ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरूवारी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्याच्या काश्मीरमधील अस्वस्थतेमागे पाकिस्तान आहे असा आरोप भारताने केल्यानंतर इम्रान खान यांनी ट्विट केले असून यात त्यांनी “सध्या तणावग्रस्त परिस्थिती आहे. त्याचा फायदा घेत, घुसखोरी होत असल्याचा आरोप भारताकडून सातत्याने होत आहे. तसेच याच्या आडून भारत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. 

तसेच त्यांनी “पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करण्यासाठी भारत कारणे शोधत असून भारताकडून होत असलेला घुसखोरीचा आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We may be attacked by India Imran Khan