कोरोनाविरुद्ध अस्त्र - स्पाइक प्रोटिनचे तुकडे

spike protein
spike protein

ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी  कोरोनावरील लस तयार करण्यासाठी त्यांनी तापेच्या औषधाची मदत घेतली आहे. व्हिक्टोरिया राज्यात या औषधांचा मानवावर प्रयोग सुरू केला आहे. लसचे नाव एनव्हीएक्स- सीओव्ही २३७३ असे आहे. या औषधाची निर्मिती अमेरिकेच्या नोव्हाव्हॅक्सने केली आहे. दक्षिण गोलार्धात हा पहिला प्रयोग मानला जात आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कंपनीच्या संशोधकाच्या मते, लस ही इम्यून सिस्टिमच्या म्हणजेच रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशींवर प्रयोग करेल, जेणेकरून ही लस संसर्गाचा मुकाबला करु शकेल. प्रयोगासाठी वापरण्यात येणारी लस ही संपूर्ण संसर्गावर नियंत्रण करण्याऐवजी कोरोनाच्या स्पाइक प्रोटिनवर हल्ला करेल. संसर्गाचा हा भाग आजार पसवरण्यासाठी महत्त्वाचा घटक मानला जातो. स्पाइक प्रोटिनचे संसर्गाच्या विषाणूला कवच असते आणि त्यामुळे कोरोनावर सहजपणे ताबा मिळवता येत नाही.

पेशींना सिग्नल
संशोधकाच्या मते, लसमध्ये मॅट्रिक्स-एम नावच्या नॅनो पार्टिकलचा समावेश असेल. हे पार्टिकल शरिरातील आजाराचा धोका ओळखून रोगप्रतिकारक शक्तीला सिग्नल देतील. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशी सजग राहतील आणि सक्रिय होतील. शेवटी त्या प्रोटिनच्या तुकड्यांना नष्ट करतील. 

हिवतापाच्या लसवर आधारित
प्रयोगासाठीची  लस हिवतापाच्या (इन्फ्लूएंझा व्हायरस) उपचारासाठी आहे. त्यास आपण नॅनोफ्लू म्हणतो. हे औषध नोव्हाव्हॅक्सने तयार केले आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या टप्प्यात २६५० जणांवर प्रयोग केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com