अंदमान, निकोबारवर ‘असानी’ चक्रीवादळाचे सावट

काही भागात पाऊस सुरू; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
weather update Asani Tropical Cyclone Andaman Nicobar Port Blair
weather update Asani Tropical Cyclone Andaman Nicobar Port Blairsakal

पोर्ट ब्लेअर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘असानी’ चक्रीवादळाचे सावट अंदमान आणि निकोबार बेटावर स्पष्टपणे जाणवू लागल्याने सोमवार दुपारपासून पावसाला सुरवात झाली. काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा असून आज हा दबाव अधिक वाढल्याने त्याचे रूपांतर सायंकाळपर्यंत चक्रीवादळात होऊ शकते, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली. परिणामी बेटावर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. नागरिकांना आणि आपत्कालिन यंत्रणांना दक्षतेचा इशारा देण्यात असून लष्कराही सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर अंदमानच्या समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो आणखी वाढला आहे. त्यामुळे वादळ उत्तर आणि वायव्य दिशेकडे १२ किलोमीटर प्रति तासाने पुढे सरकत आहे. सायंकाळपर्यंत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. चक्रीवादळाची शक्यता पाहता एनडीआरएफच्या तुकड्यांना पोर्टब्लेअरमध्ये तैनात केले असून लष्कर आणि नौदलाला देखील सज्जतेचे निर्देश दिले आहेत. भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञानुसार चक्रीवादळ येत्या ४८ तासांत अंदमान आणि निकोबार बेटावरून पुढे सरकेल आणि नंतर ते म्यानमारच्या दिशेने जाईल. त्यामुळे येत्या काही तासात ७५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकते. चक्रीवादळाचा संभाव्य फटका बसणाऱ्या भागात जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. मच्छीमारांना देखील सोमवारी आणि मंगळवारी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

चक्रीवादळादरम्यान वीजसेवा विस्कळीत होण्याची आणि पावसामुळे पूर किंवा भूस्खलन होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. येत्या २२ मार्चपर्यंत द्विपअंतर्गत सर्व वाहतूक सेवा स्थगित केल्याचेही प्रशासनाने सांगितले. आज सकाळपर्यंत अंदमान येथे ८.३० पर्यंत १३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर पोर्ट ब्लेअर येथे २६.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तीन जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

अंदमान बेटावर तयारी

  • एनडीआरएफचे दीडशे जवानांना सज्ज राहण्याची सूचना

  • पोर्टब्लेअरमध्ये ६७ तर अन्य तीन ठिकाणी प्रत्येकी २५ जवान तैनात

  • बेटावरील विविध भागात सहा मदत छावण्यांची उभारणी

  • पुढील दोन दिवस मासेमारी आणि पर्यटन स्थळ बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com