तापमानवाढ : अपारंपरिक ऊर्जा वापरा; पर्यावरणासाठी यूनोची ‘पंचसूत्री’

तापमानवाढीची समस्या गंभीर बनत चालली असून हरितगृहवायूंचे प्रमाण, समुद्रावरील तापमान, सागर पातळीत वाढ आणि समुद्राच्या पाण्याचे आम्लीकरण यांनी उच्चांक गाठला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
weather update United Nations announced five-pronged increasing use of unconventional energy worldwide
weather update United Nations announced five-pronged increasing use of unconventional energy worldwidesakal

जीनिव्हा : अपारंपरिक ऊर्जेचा जगभरात वापर वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्राने आज पंचसूत्री जाहीर केली. तापमानवाढीची समस्या गंभीर बनत चालली असून हरितगृहवायूंचे प्रमाण, समुद्रावरील तापमान, सागर पातळीत वाढ आणि समुद्राच्या पाण्याचे आम्लीकरण यांनी उच्चांक गाठला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तापमानवाढीच्या मोठ्या आणि गंभीर समस्येकडे सर्वांचे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी आज अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी ही पंचसूत्री जाहीर केली. मानवाचे एकमेव निवासस्थान असलेल्या पृथ्वीची होरपळ होण्याआधी आपण जैविक इंधनापासून होणारे प्रदूषण निश्‍चयाने थांबवून शाश्‍वत ऊर्जेकडे वळायला हवे, असे आवाहन गुटेरेस यांनी केले.

मागील सलग सात वर्षे ही आतापर्यंतची सर्वाधिक उष्ण वर्षे ठरल्याचा अहवाल जागतिक हवामान संघटनेने दिल्याच्या पार्श्वभूमीवर गुटेरेस यांनी हे आवाहन केले आहे. तीव्र हवामानामुळे मृत्यू आणि रोगराई, स्थलांतर, आर्थिक नुकसान यांचे प्रमाण वाढेल, असे म्हटले आहे. जैविक इंधनावर विविध देशांमध्ये अंशदान दिले जाते. ते रद्द करावे, असे आवाहन गुटेरेस यांनी केले. लोकांच्या खिशावर ताण पडला तरी अंतिमत: पर्यावरणाला त्याचा फायदा होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

उपाय करणे का आवश्‍यक?

हरितगृह वायू वातावरणात अडकून पडल्याने पृथ्वीच्या आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. या वाढलेल्या तापमानाचा परिणाम म्हणून पूर, दुष्काळ, वादळे, वणवे अशा नैसर्गिक आपत्ती येण्याचे प्रमाण आणि त्यांची तीव्रता वाढली आहे.

संयुक्त राष्ट्रांची पंचसूत्री

  • अपारंपरिक ऊर्जा तंत्रज्ञानावरील बौद्धीक संपदा हक्क रद्द करावेत

  • अपारंपरिक ऊर्जेची संबंधित कच्च्या माल आणि पुरवठा साखळी सर्वांनाच उपलब्ध व्हावी

  • अपारंपरिक ऊर्जेच्या प्रसारासाठी देशांनी आपल्या धोरणांमध्ये सुधारणा करावी

  • जैविक इंधनाला दिले जाणारे अंशदान रद्द केले जावे

  • अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राकडून होणारी गुंतवणूक तिपटीने वाढावी

पर्यावरणासमोरील समस्येचा सामना करण्यात मानवजातीला अपयश येत आहे. जगातील ऊर्जा यंत्रणा मोडकळीस आली असून आपण आपत्तीच्या तोंडावर उभे आहोत.

- अँटोनिओ गुटेरेस, सरचिटणीस, यूएन

हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचा सोपा मार्ग म्हणजे कमी किमतीत स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देणे. श्रीमंत देश स्वच्छ ऊर्जेसाठी येणारा मोठा खर्च सहन करू शकत असले तरी गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना ते परवडणारे नाही. त्यामुळे सर्वांनीच या ऊर्जेचा वापर करावा असे वाटत असेल तर ती स्वस्तात उपलब्ध करून द्यायला हवी.

- झेक हौसफादर, पर्यावरण शास्त्रज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com