esakal | पुढील वर्षी भुकेचा प्रश्‍न बिकट; ‘डब्लूएफपी’चे अध्यक्ष बिस्ली यांचा इशारा 
sakal

बोलून बातमी शोधा

पुढील वर्षी भुकेचा प्रश्‍न बिकट; ‘डब्लूएफपी’चे अध्यक्ष बिस्ली यांचा इशारा 

दररोज विविध संघर्षात, नैसर्गिक आपत्तींमध्ये काम करते. अनेक वेळा आमचे कर्मचारी लाखो भुकेल्यांना अन्न पुरविण्यासाठी स्वत:चा जीवही धोक्यात घालतात. मात्र, अद्यापही आमचा कस लागलेला नाही, कारण परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.

पुढील वर्षी भुकेचा प्रश्‍न बिकट; ‘डब्लूएफपी’चे अध्यक्ष बिस्ली यांचा इशारा 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क -  यंदाच्या वर्षापेक्षा पुढील २०२१ हे वर्ष अधिक धोकादायक ठरणार असून अब्जावधी डॉलरचे साह्य झाल्याशिवाय संभाव्य आपत्तीचा आपण सामना करू शकत नाही, असा इशारा जागतिक अन्न कार्यक्रमाचे (डब्लूएफपी)अध्यक्ष डेव्हीड बिस्ली यांनी दिला आहे. हा इशारा सर्व जागतिक नेत्यांपर्यंत पोहोचवता यावा, यासाठीच नोबेल समितीने जागतिक अन्न कार्यक्रमाला शांतता पुरस्कार दिला असल्याची भावना बिस्ली यांनी व्यक्त केली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘असोसिएटेड प्रेस’ने घेतलेल्या मुलाखतीत डेव्हीड बिस्ली म्हणाले की, आमची संघटना दररोज विविध संघर्षात, नैसर्गिक आपत्तींमध्ये काम करते. अनेक वेळा आमचे कर्मचारी लाखो भुकेल्यांना अन्न पुरविण्यासाठी स्वत:चा जीवही धोक्यात घालतात. मात्र, अद्यापही आमचा कस लागलेला नाही, कारण परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अन्न संघटनेच्या आकडेवारीनुसार
१३ कोटी लोक - वर्षाअखेरीपर्यंत कुपोषणाच्या उंबरठ्यावर
२७ कोटी लोक  -  पुढील वर्षाअखेरीपर्यंत कुपोषणग्रस्त
१५ अब्ज डॉलर  - अर्थसाह्याची आवश्‍यकता

या देशांमध्ये  परिस्थिती बिकट
येमेन, दक्षिण सुदान, नायजेरिया आणि बुर्किना फासो

या देशांमधील स्थिती गंभीर 
अफगाणिस्तान, कॅमेरुन, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, काँगो, इथिओपिया, हैती, लेबेनॉन, माली, मोझांबिक, नायजर, सोमालिया, सुदान, सीरिया, व्हेनेझ्युएला, झिम्बाब्वे