Sea Facts : जगभरात समुद्राचं अस्तित्व एका दिवसासाठी नष्ट झालं तर काय होईल? l what will happen if sea vanished distroy for one day from earth know what impact on earth | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sea Facts

Sea Facts : जगभरात समुद्राचं अस्तित्व एका दिवसासाठी नष्ट झालं तर काय होईल?

Sea Facts : आपल्या पृथ्वीवर एकूण जमिनीच्या ७१ टक्के परिसरात समुद्र पसरलेला आहे. आणि पृथ्वीवरच्या एकूण भागापैकी ९७ टक्के भाग हा समुद्राच्या पाण्याखाली आहे. समुद्रावर जगभरातील हवामान निश्चित होतं. आणि त्याप्रमाणे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा सुरु होतो. मात्र जर समुद्राचे एका दिवसासाठीही अस्तित्व नष्ट झाले तर काय होईल बरं?

समुद्री व्यवसाय आणि रोजगाराच्या आधारावर जगभरातील एकूण चार कोटी लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. जगभरात एका दिवसासाठीसुद्धा समुद्राचं अस्तित्व नष्ट झालं तर या सगळ्या लोकांवर उपासमारीची वेळ येईल. अचानक समुद्र कोरडा पडला तर समुद्रातील सगळे जीवजंतू मरून जातील.

हे जीवजंतू सडून त्याचा वास जगभरात पसरेल आणि त्याचा परिणाम पृथ्वीतलावरील मनुष्यावर होईल. समुद्र कोरडा पडल्यास १.३ अरब कोटी स्केअर मीटर जागा मोकळी तर होईल पण या मोकळ्या जागेवर हवेचा वेग जास्त राहील. ज्यामुळे वायुमंडलमध्ये हवेचे घनत्व कमी होईल. अशा परिस्थिती उंच ठिकाणी राहाणाऱ्या लोकांना श्वास घेणेही कठिण होईल.

तापमानातही होईल बदल

तापमानातही घट होईल. अचानक समुद्राचं पाणी गायब झालं तर मान्सूनचं चक्रसुद्धा विस्कळेल. समुद्रावर ढगसुद्धा राहाणार नाही आणि पुथ्वी सूर्याच्या तीव्र उष्णतेने भाजून जाईल. ग्लेशियर आणि बर्फाळ पर्वतरांगा वितळून जाईल. समु्द्र नसल्यास सगळी हिरवळ नष्ट होईल. कारण समुद्र नसल्याने पृथ्वीवर ऑक्सिजनची मात्रा कमी होईल. (Environment)

समुद्र नसेल तर पाऊसही पडणार नाही आणि झाडे सुकून जातील. हिरवळ नष्ट होईल आणि प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढेल. वातावरण अशुद्ध होईल. समुद्र नसल्याने पर्वतांचा आकार वाढेल. गरम हवेने पृथ्वीची वरची पातळी पातळ होईल ज्यामुळे ज्वालामुखीचे विस्फोट वारंवार होतील. तसेच पृथ्वीचा भारही हळू हळू कमी होईल.

पर्यावरणाचा प्रत्येक भाग हा तेवढाच महत्वाचा आहे. तेव्हा पर्यावरण जपणे आणि त्याची निगा राखणे ही आपली प्रथन आणि कर्तव्यनिष्ठ जबाबदारी असायला हवी.