युरोपमध्ये अन्नधान्याबाबत भीतीचे वातावरण; IMF ने भारताला केली विनंती

Wheat export ban has created panic around the world
Wheat export ban has created panic around the worldWheat export ban has created panic around the world

गव्हाचा (Wheat) तुटवडा निर्माण झाल्यानंतर आणि युक्रेनच्या संकटाच्या वेळी भारताने निर्यात थांबवल्यानंतर युरोपमध्ये अन्नधान्याबाबत भीतीचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) प्रमुखांनी भारताने लवकरात लवकर गहू निर्यात बंदी विचारात घेण्याचे आणि उठवण्याचे आवाहन केले आहे. भारताने बंदी उठवली नाही तर इतर अनेक देशही असेच करू लागतील. मग अन्न संकटाचा सामना करणे कठीण होईल, असे स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान ते म्हणाले. (Wheat export ban has created panic around the world)

मला माहिती आहे की भारताला १३५ कोटी लोकांना अन्न द्यायचे आहे. यावेळी कडक उन्हामुळे गव्हाचे (Wheat) उत्पादनही घटले आहे. तरीसुद्धा भारताने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा आणि निर्यातीवरील निर्बंध उठवावेत अशी विनंती आहे. जर आणखी देशांनी असे करायला सुरुवात केली तर या समस्येला तोंड देणे कठीण होईल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या.

Wheat export ban has created panic around the world
ओवैसींच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुस्लिम धर्मगुरूही संतापले; म्हणाले...

सध्या अशी परिस्थिती नाही पण ती पूर्णपणे परिस्थितीबाहेरही नाही. हे एक कठीण वर्ष असणार आहे. रशिया-युक्रेन (Russia) युद्धामुळे अन्नधान्याच्या किमती वाढणे ही एक मोठी समस्या आहे, असेही क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या महासंचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी वाढते व्याजदर, महागाई, डॉलरची मजबुती, चीनमधील मंदी, हवामान संकट आणि क्रिप्टोकरन्सीची ढासळलेली स्थिती यांचाही उल्लेख केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com