मेंढीच्या युद्धामध्ये कुत्राचा प्रवेश झाला आणि पुढे...

सुस्मिता वडतिले
Saturday, 12 September 2020

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की, ज्यामध्ये दोन मेंढ्या आप-आपसात भांडत करत आहेत. मग त्याचवेळी त्या दोघांचे भांडण मिटवण्यासाठी एक कुत्रा मध्यभागी आलेला आहे. 

पुणे : रोज नवनवीन मजेदार किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतातच. असे अनेक किस्से काहीजण न चुकता सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्याचप्रमाणे आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे, असे काही मजेदार व्हिडिओ पाहून प्रत्येकजण थक्क होऊन जातो. असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की, ज्यामध्ये दोन मेंढ्या आप-आपसात भांडत करत आहेत. मग त्याचवेळी त्या दोघांचे भांडण मिटवण्यासाठी एक कुत्रामध्ये येतो.

 

इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी  'ब्रेक-अप, नो फाइट' हे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, काही मेंढ्या शेतात फिरत आहेत. यापैकी दोन मेंढ्या आपापसात भांडण सुरू करतात. हे दोन्ही मेंढ्या एकमेकांच्या समोरासमोर येताच लगेचच एक कुत्रा मध्यभागी आलेला आहे. 

कुत्रा आत येताच तो समोर असलेल्या मेंढराचा पाठलाग करतो आणि त्यास पाठिंबा देतो. तर दुसरी मेंढरे स्वत: हून माघार घेत आहेत. अशा प्रकारे भांडण शांततेत मिटले आहे. एक गोंडस कुत्रा पाहून प्रत्येकजण हसत आहे. लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाईक करत आहेत. तो भरपूर व्हायरल होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When two sheep are fighting a dog comes to settle their quarrel