अमेरिकेची मोठी घोषणा! १ लाख युक्रेनिअन नागरिकांना देणार आश्रय

अमेरिका १ बिलियन डॉलरचा मदत निधीही उपलब्ध करुन देणार
joe biden
joe bidenjoe biden america us

वॉशिंग्टन : रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) अद्याप थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत या पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारनं (Biden Administration) गुरुवारी मोठी घोषणा केली. सुमारे १ लाख युक्रेनिअन नागरीक आणि इतर लोक ज्यांनी युद्धामळं युक्रेनमधून पलायन केलं आहे, अशांना अमेरिका आश्रय देणार आहे. व्हाईट हाऊस (White House) या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यालयानं हे जाहीर केलं आहे. (White House says US will welcome up to one lakh Ukrainian refugees)

व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटलं की, "'निर्वासित प्रवेश कार्यक्रमां'तर्गत अमेरिकेकडून निर्वासितांचे कायदेशीर मार्गानं स्वागत करण्यात येईल. तसेच अमेरका आणि युरोपियन युनियन देखील या प्रयत्नांसाठी नियोजन करतील. यामध्ये मानवतावादी प्रवेश किंवा इतर प्रकारे पूरक हस्तांतरण आणि युक्रेनचे शेजारील देशांना आवश्यक समर्थन मदत देण्यात येईल"

दरम्यान, बायडन प्रशासनानं अशीही घोषणा केली की, या युद्धाचा फटका बसलेल्या लोकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून अमेरिकेकडून १ बिलियन डॉलरचा मदत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या निधीचा वापर युक्रेनमधील नागरिकांसाठी अन्न, निवारा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय मदत आणि इतर प्रकारच्या सहाय्यासाठी वापर करण्यात येईल.

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, युद्ध सुरु झाल्यापासून महिन्याभरात युक्रेनमधून सुमारे ३.५ मिलियन लोकांनी पलायन केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com