डोनाल्ड ट्रम्प यांनी माफी दिलेल्या 19 व्या शतकातील महिला कोण?

donald trump and suzan.jpg
donald trump and suzan.jpg

वॉशिंग्टन- अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग आला आहे. फेरनिवडीसाठी रिंगणात उतरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास दीडशे वर्षांपूर्वी मतदानाद्वारे बंड केलेल्या तसेच तुरुंगवास सोसलेल्या महिला समाजसुधारक सुझन बी. अँथनी यांना माफी दिली आहे. बायडेन यांच्या जोडीला उपाध्यक्षपदासाठी आशियाई-आफ्रिकी वंशाच्या महिला उमेदवार कमला हॅरीस यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे महिला मतदारांची मते आपल्या बाजूने वळविण्याचाही ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. सुझन यांच्या लढ्यामुळे महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्याच्या ऐतिहासिक घटनेचे यंदा शताब्दी वर्ष आहे. एकूण संदर्भ बघता ट्रम्प यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतल्याचे राजकीय निरीक्षकांचे पक्के मत आहे.

19 व्या शतकातील अग्रणी महिला समाजसुधारक म्हणून सुझन बी. अँथनी यांचे नाव घेतले जाते. सुझन या गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. समाजातील अनिष्ठ गोष्टींवर त्यांनी कायमच प्रहार केला. मद्यपानविरोधासाठीही त्यांनी अथक प्रयत्न केले होते. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ पुरुषांनाच मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. महिलांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले होते. अशावेळी 1872 साली सुझन यांनी मदतान करुन प्रचिलित प्रथेला धक्का दिला होता. यासाठी त्यांना अटकही करण्यात आली होती. तसेच तुरुंगवासही सोसावा लागला होता.

केवळ पुरुषांनाच मतदानाचा हक्क असताना रोचेस्टर (न्यूयॉर्क) येथील निवडणूकीत वयाच्या 52व्या वर्षी सुझन यांनी मतदान केले. त्यांची ही कृती क्रांतिकारी होती. त्यावेळचे अमेरिकेतील पुरुष मन एका महिलेला मतदानाचा अधिकार द्यावा या विचाराचे नव्हते. त्यामुळे सुझन यांना प्रचंड विरोधाचा सामना कराला लागला. 1872 मध्ये पहिल्यांदा मतदान केल्यानंतर त्यांना दंड भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांनी सुझन यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही.

लडाख संघर्षप्रकरणी जीनपिंग यांच्यावर महिलेची टीका; चीनने उचलले कठोर पाऊल

1869 मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय महिला मताधिकार संघटनेच्या सुझन या संस्थापक सदस्य होत्या. त्यांनी समाजातील अनेक वाईट गोष्टींविरोधात आवाज उठवला होता. पण त्या महिलांच्या मतदानाच्या अधिकारासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून अधिक ओळखल्या जातात. सुझन यांनी चालवलेल्या लढ्याला 1920 साली यश आलं. 1776 मध्ये स्वतंत्र झालेल्या अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी 1920 साल उजाडावं लागलं. अमेरिकी घटनेतील 19व्या दुरुस्तीद्वारे महिलांना मताचा अधिकार प्रदान करण्यात आला. हा निर्णय 19वी घटनादुरुस्ती (नाइटीन्थ अमेंडमेंट) म्हणून प्रसिद्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com