WHO ने कोरोनाबाबत दिला आणखी एक इशारा; सांगितले...

वृत्तसंस्था
Thursday, 25 June 2020

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 93 लाखांवर

- 14 हजार मशिन्सची खरेदी 

जिनिव्हा : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यानंतर आता यासंदर्भातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे. जगभरात येत्या एका आठवड्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटींवर पोहोचेल, अशी भीती डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केली. तसेच ऑक्सिजन मशिनची कमतरताही भासेल, असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्या तुलनेत ऑक्सिजन मशिनची मोठी कमतरता आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक देशांमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचीही कमतरता भासेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या जगभरात दर आठवड्याला सरासरी दहा लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होत आहे. त्यामुळे प्रतिदिन 88 हजार मोठे ऑक्सिजन सिलेंडर आणि 6.20 लाख क्युबिक मीटर ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. 

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 93 लाखांवर

जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 93 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. तर यातील मृतांचा आकडा 4 लाख 80 हजारांच्या पुढे गेला आहे. आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीपर्यंत जाईल, असे ते म्हणाले. 

 COVID-19

14 हजार मशिन्सची खरेदी 

जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत 14 हजार ऑक्सिजन मशिन खरेदी केली आहेत. येत्या काही दिवसात 120 देशांमध्ये ऑक्सिजन मशिन्स पाठवण्यात येणार आहे. याचा फायदा कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी होणार आहे. 

उपाययोजनांवर लक्ष देणे गरजेचे

कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांवर लक्ष देणे गरजेचे आहे.

एक लाखांहून अधिक मृत्यू

दक्षिण अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. एक लाखांहून अधिक रुग्णांचा तेथे मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये मागील आठवड्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण 25 ते 50 टक्क्यांनी वाढले, असे जागतिक आरोग्य संघटनेचे आपात्कालीन कार्यक्रमांचे प्रमुख डॉ. माइक रायन यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO chief warns of oxygen shortage as cases set to reach 10 million