
अमेरिकन खासदारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना राहुल गांधींच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केलीये.
'Rahul Gandhi यांना अपात्र ठरवणं, हा विश्वासघात'; समर्थनार्थ ट्विट करणारे रो खन्ना कोण आहेत?
भारतीय वंशाचे प्रभावशाली अमेरिकन खासदार रो खन्ना (American MP Ro Khanna) यांच्याबाबत मोठी चर्चा सुरु आहे. याचं कारणही तसंच आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवणं हा गांधीवादी विचारसरणीचा विश्वासघात आहे, असं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर रो खन्ना यांना टार्गेट करण्यात येत आहे.
भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार रो खन्ना यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रकरणाबाबत ट्विटरवर आपलं मत व्यक्त केलंय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, 'राहुल गांधींना संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवणं हा गांधीवादी विचारसरणी आणि भारताच्या मूल्यांचा मोठा विश्वासघात आहे.'
लाला लजपत राय यांच्यासाठी काम करणाऱ्या माझ्या आजोबांना 31-32 आणि 41-45 मध्ये तुरुंगात टाकण्यात आलं आणि आणीबाणीला विरोध करणारी इंदिरा गांधींना दोन पत्रं लिहून लगेचच संसद सोडली, हे पाहून वाईट वाटतं. रो खन्नांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलंय, 'भारतीय लोकशाहीच्या हितासाठी हा निर्णय मागं घेण्याची ताकद तुमच्याकडं आहे.'
कोण आहेत रो खन्ना?
रो खन्ना यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सिलिकॉन व्हॅलीचं प्रतिनिधित्व करतात. ते यूएस कॉकसचे सह-अध्यक्ष आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना राहुल गांधींच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केलीये. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे उपाध्यक्ष जॉर्ज अब्राहम यांनी राहुल गांधींची अपात्रता हा भारतातील लोकशाहीसाठी दुःखद दिवस असल्याचं म्हटलंय.