Coronavirus : आता पंतप्रधानांच्या पत्नीला कोरोनाची लागण!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 मार्च 2020

कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये अनेक राजकारण्यांचा समावेश असून आता तर चक्क कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीलाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कॅनडावासियांनीही आता कोरोनाची धास्ती घेतली आहे. 

टोरंटो : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून सामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सगळ्यांनाच या कोरोनाचा सामना करावा लागत आहे. जगभराती आतापर्यंत कोरोनाचे तब्बल साडेचार हजारांहून अधिक बळी गेले आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये अनेक राजकारण्यांचा समावेश असून आता तर चक्क कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीलाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कॅनडावासियांनीही आता कोरोनाची धास्ती घेतली आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाचे १४ रुग्ण; कर्नाटकात देशातील पहिला बळी

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची पत्नी सोफी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सोफी या गेले काही दिवस आजारी होत्या. सोफी यांनी सर्दी, ताप, खोकला झाला होता. कोरोनाच्या प्रसारानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली, यात कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. सोफी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. 

सोफी  यांना कोरोनाची लागण झाल्यापासून त्यांना सगळ्यापासून वेगळे व लांब ठेवण्यात आले आहे. सोफी यांना कोरोना लागण झाली असली, तरी ट्रुडो यांच्यात अशी कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. तरीही ट्रुडो घरूनच काम करणार आहेत. सर्व अधिकाऱ्यांशी ते फोनवरच संपर्कात असतील. तर सोफी यांच्यावर उत्तम देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भारतात आतापर्यंत ७० हून अधिक कोरोनाच्या केसेस सापडल्या असून, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर पुण्यात कोरोनाचे ८ रूग्ण सापडले असून नायडू रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife Of Canada PM Trudeau Sophie Tested Positive For Coronavirus