भारताच्या निवडणुकीत फेसबुकचा हस्तक्षेप नसेल : मार्क झुकेरबर्ग

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुकवरील वैयक्तिक डेटा केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीला देण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी अनेकदा यावर माफी मागितली.

वॉशिंग्टन : फेसबुकवरील वैयक्तिक डेटा चोरीला जात असल्याची बाब उघडकीस आली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान फेसबुकच्या युजर्सचा डेटा चोरून त्याचा वापर निवडणुकीसाठी केला जात असल्याचे समोर आल्यानंतर आता फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी देशात होणाऱ्या आगामी निवडणुकीत कंपनीकडून कोणताही हस्तक्षेप करण्यात येणार नाही, असे सांगितले.

Facebook

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुकवरील वैयक्तिक डेटा केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीला देण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी अनेकदा यावर माफी मागितली. त्यानंतर आता त्यांनी अमेरिका, भारत, ब्राझील यांच्यासह अन्य काही देशांमध्ये होणाऱया निवडणुकांमध्ये फेसबुककडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, असे सांगितले आहे.  

दरम्यान, 'फेसबुक'च्या 8.70 कोटी यूजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे उघडकीस आले. ही जबाबदारी स्वीकारून मार्क झुकेरबर्ग यांनी आज अमेरिकी काँग्रेसची माफी मागितली. यूजर्सची माहिती गोपनीय ठेवण्यासाठी योग्य काळजी घेतली नसल्याचे झुकेरबर्ग यांनी आज पुन्हा एकदा मान्य केले. 

Web Title: Will ensure no one interferes in Indian elections says Mark Zuckerberg