20 जानेवारीआधी व्यवसायातून बाहेर पडेन: ट्रम्प

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

वॉशिंग्टन - अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या 20 जानेवारीच्या आधी व्यवसायामधून पूर्णपणे बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.

ट्रम्प हे 20 जानेवारी रोजी औपचारिकरित्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर, केवळ या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी व्यवसायामधून पूर्ण बाहेर पडण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. ट्रम्प हे आता त्यांचा व्यवसाय त्यांच्या दोन मुलांकडे सोपविणार आहेत.

"कायद्याने बंधनकारक नसले; तरी मी 20 जानेवारीच्या आधी माझ्या व्यवसायांमधून पूर्णपणे बाहेर पडेन. माझ्या नव्या जबाबदारीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. डॉन आणि एरिक ही माझी दोन मुले; तसेच इतर अधिकारी व्यवसाय सांभाळतील. माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये कोणतेही नवे करार केले जाणार नाहीत,'' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

व्यवसायामधून बाहेर पडण्याचे संकेत ट्रम्प यांच्याकडून गेल्या महिन्यामध्येही देण्यात आले होते. दरम्यान, इवांका ट्रम्प या त्यांच्या मुलीकडे कोणती जबाबदारी सोपविण्यात येईल, याचा उल्लेख ट्रम्प यांनी केलेला नाही. इवांका या ट्रम्प ऑर्गनायझेशन या कंपनीशी संबंधित आहेत. व्यवसायामधून पूर्णपणे पायउतार होण्यासंदर्भातील प्रक्रियेची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली जाईल, असे ट्रम्प यांनी याआधी स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर, ही परिषद जानेवारी महिन्यात होण्याचे संकेत ट्रम्प यांचे प्रवक्ते सीन स्पाईसर यांनी दिले आहेत.

Web Title: Will leave business before January 20: Donald Trump