प्रियकराचे तुकडे करून त्याची तिने बनवली बिर्याणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

एका महिलेने प्रियकराला घरी बोलावून, त्याचा खून केला आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे केले. पुढे या मृतदेहाच्या तुकड्यांची तिने बिर्याणी करून जवळच बांधकाम करणाऱ्या कामगारांना खायला दिल्याची खळबळजनक घटना संयुक्त अरब अमीरातमधील अल अइन शहरामध्ये घडली आहे. या 30 वर्षीय महिलेने न्यायालयात आपला गुन्हादेखिल कबुल केला आहे.

अल अइन- एका महिलेने प्रियकराला घरी बोलावून, त्याचा खून केला आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे केले. पुढे या मृतदेहाच्या तुकड्यांची तिने बिर्याणी करून जवळच बांधकाम करणाऱ्या कामगारांना खायला दिल्याची खळबळजनक घटना संयुक्त अरब अमीरातमधील अल अइन शहरामध्ये घडली आहे. या 30 वर्षीय महिलेने न्यायालयात आपला गुन्हादेखिल कबुल केला आहे.

आरोपी महिला आणि त्या तरुणाचे सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण काही महिन्यांपूर्वी तरुणाने मोरोक्को येथील एका तरुणीसोबत लग्न करणार असल्याचे आरोपी महिलेला सांगितले होते. त्यामुळे बदला घेण्यासाठी तिने त्याचा खून केला असल्याचे तिने आपल्याचे सांगण्यात आले आहे. तीन ते चार महिन्यांपूर्वी ही हत्या केली, मात्र याचा खुलासा आता झाला आहे. मृत तरुणाचा भाऊ त्याचा शोध घेण्यासाठी आरोपी महिलेच्या घरी पोहोचला आणि त्याने आपल्या भावाबाबत तिला विचारणा केली. त्यावेळी मला त्याच्याबाबत काहीही माहिती नाही असे त्या महिलेने सांगितले.

परंतु तिच्या घरामधील मिक्सर-ब्लेंडरमध्ये मृत तरुणाच्या भावाला मानवी दात अडकलेला दिसला आणि त्याचा संशय बळावला. त्यानंतर त्याने थेट पोलिस स्थानकांत तक्रार केली. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आणि दाताची डीएनए टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर तो दात मृत तरुणाचाच असल्याचं स्पष्ट झालं. सुरूवातीच्या चौकशीत या महिलेने पोलिसांना खोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर पोलिसांनी कसून चौकशी करण्यास केल्यावर तिने खुनाची कबुली दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Allegedly Kills Ex Boyfriend Feeds His Cooked Remains To Others