महिलेने तोंड भरून केकचा तुकडा घेतला अन्...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

केकचा मोठा तुकडा घशामध्ये अडकल्यामुळे महिलेचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. केक खाण्याच्या स्पर्धेदरम्यान ही घटना घडली.

सिडनी (ऑस्ट्रेलिया): केकचा मोठा तुकडा घशामध्ये अडकल्यामुळे महिलेचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. केक खाण्याच्या स्पर्धेदरम्यान ही घटना घडली.

व्याही-विहीणच्या प्रेमात आणखी एक ट्विस्ट...

ऑस्ट्रेलियातील क्विन्सलॅंड शहरामध्ये ही घटना घडली असून, 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया डे निमित्त जास्तीत जास्त मिठाई खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 60 वर्षीय महिलेने सहभाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान तोंडभरून केकचा तुकडा घेतला. यावेळी महिलेचा श्वास कोंडला गेला. श्वास कोंडला गेल्यामुळे महिलेला त्रास होऊ लागला. आयोजकांनी महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

दोघांनी 182 युवतींशी संभोग करून तयार केले एमएमएस...

दरम्यान, हॉटेलने आपल्या फेसबुक पेजवरून माहिती दिली. ऑस्ट्रेलियामध्ये जास्तीत जास्त खाण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. विविध हॉटेल्समध्ये या स्पर्धा असतात. या दिवशी ऑस्ट्रेलियात आलेल्या पहिल्या युरोपीयन लोकांचे स्मरण केले जाते.

नवऱयाने दोघांना 'त्या' अवस्थेत पकडले मग...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman dies during cake eating competition in australia