बॉसने ईमेलमध्ये लिहिलं XX, महिलेला वाटलं वेगळंच! विनयभंगाची केस आली अंगलट

या महिलेने कोर्टात म्हटले, की बॉसने ईमेलमध्ये XX लिहिलंय, ज्याचा अर्थ किस आहे.
Boss Mail
Boss MailEsakal

आपल्या बॉसने केलेल्या ईमेलचा चुकीचा अर्थ काढणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. ईमेलमध्ये लिहिलेला XX हा शब्द वाचून लंडनमधील एका महिलेने आपल्या बॉसवर विनयभंगाचा खटला दाखल केला होता. मात्र. हा ईमेल पाहिल्यानंतर कोर्टाने या महिलेलाच पाच लाखांचा दंड ठोठावला.

काय आहे प्रकरण?

लंडनमधील essDOCS या कंपनीमध्ये काम करणाऱ्या करीना गास्पारोव्हा या महिलेला तिच्या बॉसने एक इमेल केला होता. अ‍ॅलेक्झँडर गाउलँड्रिस असं या बॉसचं नाव आहे. बॉसने ईमेलमधून आपल्याला किस मागितले, आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी इशारे दिल्याचा आरोप या महिलेने केला होता.

बॉसने खरंतर महिलेला असा ईमेल केला होता -

Boss News
Boss NewsEsakal

या महिलेने रोजगार न्यायाधिकरणासमोर म्हटले, की बॉसने ईमेलमध्ये XX लिहिलं आहे, ज्याचा अर्थ किस आहे. तसेच ईमेलमधील YY चा अर्थ शारीरिक संबंध असा आहे. तर ???? याचा अर्थ 'तू कधी तयार असशील?' असा असल्याचा आरोप महिलेने केला. (Marathi Tajya Batmya)

तसेच, आपण बॉसच्या या मागणीला नकार दिल्यामुळेच तो आपल्यावर ओरडत असल्याचंही या महिलेने आपल्या आरोपांमध्ये म्हटलं.

Boss Mail
Viral Video : बॉयफ्रेंडसोबत चॅटिंग करताना नवऱ्याने बायकोला रंगेहात पकडलं; झालं तुफान भांडण

बॉसला दिलासा महिलेला दणका

महिलेच्या आरोपांनंतर न्यायाधीशांनी पुरावा म्हणून सादर केलेला बॉसचा ईमेल पाहिला. न्यायाधीश एम्मा बर्न्स यांनी यानंतर महिलेचे दावे हे तिरकस असल्याचं म्हटलं.

त्यांनी या प्रकरणात अ‍ॅलेक्झँडर यांना निर्दोष ठरवले. तसेच कंपनीमध्ये सुमारे पाच हजार पौंड, म्हणजेच ५,१३,०१२ रूपये भरण्याचे आदेश कोर्टाने महिलेला दिले. (Latest Marathi News)

Boss Mail
Appraisal Tips : अप्रेजल जवळ आलंय; बॉसला या गोष्टी सांगाल तर मिळेल भरगोस पगारवाढ

"गास्पारोव्हा यांनी पूर्णपणे निष्पाप अशा कामासंबंधी ईमेलचा चुकीचा अर्थ काढला. ज्यामुळे अ‍ॅलेक्झँडर यांच्यावर चुकीचे आरोप लावले गेले. तसेच, करीना यांनी दिलेल्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आली", असं एम्मा यांनी निकाल जाहीर करताना स्पष्ट केलं.

Boss Mail
Job Promotion Tips : कामाच्या ठिकाणी इंक्रीमेंट-प्रमोशन हवंय? मग आजच करा हे उपाय अन् बघा चमत्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com