औषधामुळे महिलेचे रक्त झाले निळे 

औषधामुळे महिलेचे रक्त झाले निळे 

प्रोव्हिडन्स : प्रत्येक व्यक्तीचा रंग, रूप जरी वेगळे असले तरीही रक्ताचा रंग मात्र लालच असतो. मात्र अमेरिकेच्या एका राज्यात 25 वर्षीय महिलेच्या रक्ताचा रंग निळा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका औषधाच्या दुष्परिणामामुळे असे झाले असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे असून याबाबतची माहिती न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासात काही डॉक्‍टरांनी दिली आहे. 

अमेरिकेच्या ऱ्होड आयलॅंडमधील प्रोव्हिडन्स या शहरातील 25 वर्षीय महिलेला अचानक अशक्तपणा, थकवा, श्‍वास लागणे यांसारखे त्रास होऊ लागल्याने त्वरित आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. यावेळी तिची रक्ततपासणी करीत असताना तिच्या रक्ताचा रंग निळा झाला असल्याचे डॉक्‍टरांच्या निदर्शनास आले.

विशेष म्हणजे तिचे सर्व शरीरच निळे पडले होते. संबंधित घटना घडण्यापूर्वीच्या रात्री त्या महिलेने दात दुखत असल्याने एक औषध अतिप्रमाणात घेतले होते. त्यामुळेच हा त्रास झाला असल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले आहे. 

"हे' आहे कारण 

पुढील तपासणीत रक्ताचा रंग व शरीर निळे पडण्याला वैद्यकीय भाषेत "सायनोटिक' असे नाव असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तसेच हा त्रास रक्त पेशींमधील ऑक्‍सिजनची पातळी कमी झाल्यामुळे होतो, अशीही माहिती डॉक्‍टरांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com