World Consumer Day : ग्राहकाला मिळालेले 6 हक्क कोणते? जाणून घ्या सविस्तर l World Consumer Day 2023 rights benefits awareness | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Consumer Day

World Consumer Day : ग्राहकाला मिळालेले 6 हक्क कोणते? जाणून घ्या सविस्तर

World Consumer Day 2023 : ग्राहक हा बाजारपेठेचा राजा म्हटलं जातं. सर्वात महत्वाचा घटक मानला जातो. वाजवी किंमतीत शुद्धतेसह गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळावे एवढीच ग्राहकाची अपेक्षा असते. ग्राहकांच्या हिताचे रक्षण होत त्यांना संरक्षण मिळावे म्हणून ग्राहक कायदा बनवण्यात आला आहे. या काद्याच्या मदतीने ग्राहक आपल्या हक्कांचे संरक्षण तसेच अनिचित व्यापाऱ्याकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत तक्रार देखील करू शकतो.

जागतिक ग्राहकदिन म्हणून 15 मार्च हा दिवस साजरा केला जातो. ग्राहकांना आपल्या मुलभूत हक्कांची माहिती असणे आवश्यक आहे. जाणून घेऊया ग्राहक हक्कांविषयी.

ग्राहकांचे मूलभूत हक्क

सुरक्षेचा हक्क

सुरक्षित वस्तू खरेदी हा ग्राहकाचा हक्क आहे. जी वस्तू खरेदी करतो त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी उत्पादकाचा असतो. विक्रेत्याने नेहमी उच्च गुणवत्ता असणाऱ्या वस्तूंची विक्री करावी. काही तक्रारी जाणवत असल्यास कंपनीकडे तक्रार करावी.

ग्राहकांनीही गुणवत्ता पूर्ण वस्तू खरेदी करावी. यात ISI मार्क चिन्ह असलेली आणि ISOप्रमाणित असलेल्या वस्तू वापराव्यात. वस्तूंची गुणवत्ता आणि त्यासोबतच्या सेवांबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार ग्राहकांना आहे.

निवडीचा हक्क

ग्राहकाने कोणती वस्तू घ्यावी, कोणत्या कंपनीची घ्यावी याची निवडज करण्याचा हक्क आहे. त्यामुळे जर विक्रेता तुम्हाला एकाच ब्रँडची वस्तू घेण्याचा आग्रह करत असेल तर त्याच्या विरोधात तुम्ही तक्रार करू शकतात.

माहितीचा हक्क

ग्राहकाला उत्पादनाविषयी सगळी माहिती उदा., उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, किंमत, शुद्धता, एक्स्पायरी डेट या बाबतची सर्व माहिती मिळणे आवश्यक आहे.

मत मांडण्याचा हक्क

कायद्यानिसार ग्राहकाला आपले मत मांडण्याचा हक्क आहे. ग्राहकाने विकत घेतलेल्या वस्तूमध्ये काही बिघाड झाल्यास किंवा वस्तू खराब असल्यास त्याच्या विरोधात मत मांडण्याचा हक्क ग्राहकाला आहे. जर फसवणुक झाली असं वाटत असेल तर ग्राहक त्या व्यावसायिक, कंपनीची तक्रार ग्राहक मंचात करू शकतात.

तक्रार निवारणाचा हक्क

फसवणुक झाल्यास उत्पादन, व्यावसायिक किंवा कंपनीविषयी तक्रार असो ग्राहक याबाबत कायद्यांतर्गत तक्रार करू शकतो. ग्राहक मंच किंवा ग्राहक तक्रार निवारण केंद्राला त्याचे निराकारण करावे लागते.

ग्राहक शिक्षण हक्क

ग्राहकाला आपल्या हक्कांविषयी माहिती होऊन त्याची फसगत होऊ नये म्हणून त्याला जागरुक करण्यासाठी सरकारद्वारे विविध उपक्रम राबवले जातात. त्यात जागो ग्राहक जागो, शिबीरं आणि कार्यशाळा घेतल्या जातात. या अंतर्गत ग्राहक कायद्याचे शिक्षण घेण्याचे अधिकार ग्राहकाला आहे. ग्राहकांच्या हक्कासाठी देशात हेल्पलाईन सुविधा आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन 1800114000 या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतो.

टॅग्स :Consumer Commission