तूम्हाला माहितीय का जागतिक ग्राहक हक्क दिन का साजरा केला जातो? World Consumer Rights Day 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Consumer Rights Day 2023

World Consumer Rights Day 2023 : तूम्हाला माहितीय का जागतिक ग्राहक हक्क दिन का साजरा केला जातो?

जगभरात १५ मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय ग्राहक चळवळीतील उत्सव आणि एकता यासाठी हा दिवस साजरा करतात. ग्राहक चळवळीद्वारे दरवर्षी 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो.

जगभरात ग्राहक हक्क आणि गरजांबद्दल जागरूकता वाढवण्याचे एक साधन म्हणून हा दिवस महत्वाचा असतो. हा दिवस साजरा करण्यामागे ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची मागणी होत असते.

जागतिक ग्राहक हक्क दिनाची प्रेरणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत जॉन एफ केनेडी यांच्याकडून घेतली गेली. त्यांनी १५ मार्च १९६२ रोजी युएस कॉंगेसला एक विशेष मॅसेज पाठवला. यामध्ये त्यांनी ग्राहक हक्कांचा मुद्दा ठळकपणे मांडला. असे करणारे ते पहिले जागतिक नेते होते.

त्यानंतर ग्राहक चळवळीने १९८३ मधली तारीख ठरवली. त्यानंतर १५ मार्चपासून ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांच्या महत्वाच्या समस्यांवर योग्य दिशा देऊन त्या सोडविण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

स्वच्छ उर्जा संक्रमणाद्वारे ग्राहकांचे संरक्षण संकल्पनेबद्दल 

जीवाश्म इंधनासारख्या पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, आणि शाश्वतता, सुरक्षितता, किफायतशीरपणा, आणि ग्राहकांसाठी दीर्घ काळ उपलब्धतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्वच्छ ऊर्जा उपायांकडे जलद संक्रमण करता यावे, यासाठीच्या संकल्पनेला अनुसरून, तंत्रज्ञानाच्या वापरावर प्राथमिक भर दिला जाणार आहे.

ग्राहक हक्कांबद्दल काही तथ्ये

- ग्राहक न्यायालयात हजर राहण्यासाठी वकिलाची गरज नाही

- एखादी व्यक्ती स्वतःहून त्यांच्या केसचे प्रतिनिधित्व करू शकते आणि त्याला कोणत्याही वकिलाची गरज नाही

- एक ग्राहक म्हणून, तुम्हाला वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता, शुद्धता, किंमत, प्रमाण इत्यादी सर्व उत्पादन माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे.

- प्रत्येक ग्राहकाला त्यांना हवी असलेली वस्तू आणि सेवा निवडण्याचा किंवा त्याचा पर्याय निवडण्याचा अधिकार आहे

- अनुचित व्यवसाय पद्धतींविरुद्ध ग्राहक भरपाई मागू शकतो

- जगातील सुमारे ८० देशांनी ऑनलाइन खरेदीसाठी व्यावसायिक नियमांमध्ये ग्राहक संरक्षणाची तत्त्वे समाविष्ट केली आहेत.