Davos 2023 : दावोसमध्ये जगातले दिग्गज उद्योजक गोळा झाले पण भरभराट झाली फक्त वेश्याव्यवसायाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prostitution in Davos
Davos 2023 : दावोसमध्ये जगातले दिग्गज उद्योजक गोळा झाले पण भरभराट झाली फक्त वेश्याव्यवसायाची

Davos 2023 : दावोसमध्ये जगातले दिग्गज उद्योजक गोळा झाले पण भरभराट झाली फक्त वेश्याव्यवसायाची

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये सध्या जगभरातले नेते, उद्योगपती, सेलिब्रिटीजची गर्दी आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने इथे दिग्गज जमले आहेत. दरम्यान याच काळात या भागातल्या वेश्याव्यवसायात मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

डेलीमेल, न्यूयॉर्क पोस्टसारख्या अनेक परदेशी माध्यमसंस्थांनी याविषयीचं निरीक्षण नोंदवलं आहे. दावोसमध्ये सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं पाच दिवसीय वार्षिक अधिवेशन आहे. या मेळाव्यामुळे वेश्यांच्या मागणीमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, दावोसमध्ये देहविक्री करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणावर जमा झाल्या आहेत.

हेही वाचा - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: CM Eknath Shinde on Davos Daura: मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळालं?

अतिश्रीमंतांसाठी या महिलांकडून खास सेवा दिली जात आहे. एका रात्रीसाठी या महिला अडीच हजार डॉलर्स इतका दर आकारत आहेत. उच्चभ्रू लोकांच्या गर्दीमध्ये जाण्यासाठी त्यांच्याप्रमाणेच उंची कपडे परिधान करून या महिला त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. दावोसपासून अवघ्या १०० मैलांवर असलेल्या अरगाऊ या शहरामध्ये एस्कॉर्ट सर्विस चालवली जात आहे.

बिल्ड या जर्मन वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने एका वेश्येसोबत संवाद साधला. आपल्याकडे पहिल्याच दिवशी ११ जणांचं बुकिंग झालंय तर २५ जणांची चौकशी झालीय, असं तिने सांगितलं.काही जणांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठीही बुकिंग केलं आहे. स्वित्झर्लंडमध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीर केलेला आहे.

टॅग्स :Prostitution