जागतिक अर्थव्यवस्थेला धूम्रपानामुळे मोठा फटका

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

जिनेव्हा ः धूम्रपानामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दर वर्षी तब्बल एक ट्रिलियन (एक हजार अब्ज) डॉलरचा फटका बसत असल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या (डल्ब्यूएचओ) ताज्या अहवालातून समोर आले आहे. धूम्रपानामुळे सध्या जेवढे मृत्यू होतात, त्यात 2030 मध्ये 33 टक्‍क्‍यांनी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

"डल्ब्यूएचओ' आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेने केलेल्या पाहणीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यातील निष्कर्ष धक्कादाय आहेत. तंबाखूवर आकारल्या जाणाऱ्या करातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा धूम्रपानावर होत असलेला खर्च प्रचंड मोठा आहे. 2012-13 मध्ये तंबाखूवरील करातून एकूण 269 अब्ज रुपयांचा महसूल गोळा झाल्याचा अंदाज "डल्ब्यूएचओ'ने व्यक्त केला आहे.

तंबाखूवरील करातून 269 अब्ज एवढी रक्कम गोळा होत असताना, धूम्रपानावर मात्र जागतिक अर्थव्यवस्थेला एक हजार कोटी रुपयांचा फटका बसला असल्याची धक्कादायकबाब "डल्ब्यूएचओ'च्या अहवालातून समोर आली आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे, की तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 2030 पर्यंत प्रतिवर्षी 60 लाखांवरून 80 लाखांवर पोचणार असल्याची शक्‍यता आहे. एकूण मृत्यूंपैकी 80 टक्के मृत्यू हे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांतील असणार आहेत.

Web Title: world economy affected by smoking