कोरोनावर जगातील पहिली लस तयार; इस्राईलच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

बुधवार, 6 मे 2020

लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत.लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच इस्राईलने कोरोनावरील लस तयार केली असल्याचा दावा संरक्षणमंत्री नाफ्तलीबेन्नेट यांनी मंगळवारी केला

जेरुसलेम- कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यावर लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच इस्राईलने कोरोनावरील लस तयार केली असल्याचा दावा संरक्षणमंत्री नाफ्तली बेन्नेट यांनी मंगळवारी केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बेन्नेट यांनी एका निवेदनात म्‍हटले आहे की, इस्राईलच्या इस्राईल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च’ (आयआयबीआर) या संस्थेने कोरोनावरील लस तयार केली आहे. कोरोना विषाणू नष्ट करण्‍यासाठीच्या लसीकरणाचे सर्व टप्पे पूर्ण केले आहेत. ‘द जेरुसलेम पोस्ट’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. संशोधक पथकाने दिलेल्या माहितीच्या आधारे नाफ्तली यांनी सांगितले की, हे ‘अँटीबॉडी’ कोरोनाच्या विषाणूंवर हल्ला करून त्यांना शरीरातून नष्ट करतात. अँटीबॉडीचे पेटंट मिळविण्यासाठी आणि लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्याची ‘आयआयबीआर’ने सुरु केली आहे. याबाबत इस्राईलचे संरक्षण मंत्रालय या संस्थेशी सहकार्य करणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यााठी येथे ► क्लिक करा

गेल्या महिन्यात उंदरांवर चाचण्या 
उंदरांवर केलेल्या अँटीबॉडी आधारित लसीच्या चाचण्यांचा अभ्यास सुरु केला असल्याचे 'बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट’ने गेल्या महिन्यात जाहीर केले होते. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांच्याकडून प्लाझ्मा गोळा करण्याचे कामही संस्थेने सुरू केले आहे. 

अत्यंत आव्हानात्मक गोष्ट साध्य केल्याने ‘बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट’च्या कर्मचाऱ्यांचा मला अभिमान वाटतो. 
नाफ्तली बेन्नेट, संरक्षण मंत्री, इस्राईल