‘एचसीक्‍यू’च्या चाचण्या पुन्हा थांबविल्या; उपयोगी नसल्याचे  'डब्ल्यूएचओ' चे म्हणणे 

HCQ
HCQ

न्यूयॉर्क -  कोरोनावरील मात्रा म्हणून बरीच चर्चा झालेल्या हायड्रॉक्सिक्‍लोरोक्विनची (एचसीक्‍यू) चाचणी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पुन्हा थांबविली आहे. त्याचवेळी लोपिनॅव्हीर व रीटोनॅव्हीर या एड्‌सवरील औषधांचा एकत्र डोस देण्यासही जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातली आहे. 

रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना परिणामकारक औषध मिळावे म्हणून आंतरराष्ट्रीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली असून त्यांच्यावतीने सार्वभौम चाचण्या सुरू आहेत. हायड्रॉक्सिक्‍लोरोक्विन या औषधाची चाचणी खंडित करण्याची या संस्थेची शिफारस मान्य करण्यात आली. या औषधांच्या वापराने मृत्यूदरात कोणतीही घट झालेली दिसून आलेली नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 

अंतरिम चाचण्यांच्या निकालातून ‘एचसीक्‍यू’ आणि आरोग्याच्या निगेचे मापदंड तसेच लोपिनॅव्हीर - रीटोनॅव्हीर आणि आरोग्याचे मापदंड यांसाठीचे पुरावे मिळाले. याशिवाय सर्व चाचण्यांच्या पुराव्यांचा आढावा घेण्यात आला. एक आणि दोन जुलै रोजी संघटनेची कोरोनावरील संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपचार यावरील परिषद झाली. त्यात ही शिफारस करण्यात आली. 

रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या मृत्युदरात लोपिनॅव्हीर-रीटोनॅव्हीरमुळे फार थोडा परिणाम झाला किंवा अजिबात झाला नाही. प्रत्येक औषधाच्या अंतरिम चाचण्यांमधून मृत्यूचे प्रमाण वाढल्याचाही भक्कम पुरावा मिळाला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. या चाचण्यांचा भाग असलेल्या ‘डिस्कव्हरी’ या अतिरिक्त चाचणीनुसार रुग्णालयाच्या प्रयोगशाळांमधील निदानातून सुरक्षिततेचेही काही मुद्दे समोर आले. तज्ज्ञांच्या परीक्षणासाठी ते प्रसिद्ध केले जाणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा निर्णय रुग्णालयातील रुग्णांवरील चाचण्यांपुरता मर्यादित आहे. रुग्णालयात नसलेल्या बाधित व्यक्तींवरील उपचारांच्या अभ्यासातील संभाव्य परीक्षणाशी तो लागू नाही. याशिवाय कोरोनाची बाधा होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर प्रतिबंधात्मक औषध म्हणूनही अभ्यास सुरू राहील. 

काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या कोरोना रुग्णांवरील चाचणीसाठी परवानगी देण्यात आली होती. 

दरम्यान, काही पाश्‍चिमात्य देशांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा कोरोनावर उपयोग नसल्याचे म्हटले असले, तरी चिनी संशोधकांच्या मते या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधाने कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांचा मृत्यूदर कमी होण्यात मदत झाली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मलेरियाचे औषध हायड्रॉक्सिक्लोरोक्विन निष्प्रभ ठरत असल्याने ‘क्लिनिकल ट्रायल’वर बंदी आणली होती. 

हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा उपयोग कोरोनावर होऊ शकतो, त्यामुळे अमेरिकेनेही त्या औषधाच्या मागणीसाठी भारताशी संपर्क साधला होता. तसेच या औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठविण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची निर्यात सुरू केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com