जगभरातील इंटरनेट काही काळासाठी ठप्प

जगभरातील अनेक भागातील इंटरनेटसेवा आज काही काळासाठी बंद पडली होती. त्याचा सर्वाधिक फटका ब्रिटन आणि अमेरिकेतील वेबसाइटना बसल्याची माहिती आहे.
Internet
InternetSakal

लंडन - जगभरातील अनेक भागातील इंटरनेटसेवा (Internet Service) आज काही काळासाठी बंद (Close) पडली होती. त्याचा सर्वाधिक फटका ब्रिटन (Britain) आणि अमेरिकेतील (America) वेबसाइटना (Website) बसल्याची माहिती आहे. ‘वेब होस्टिंग’ सेवा देणाऱ्या फास्टली या कंपनीच्या कंटेंट डिलिव्हरी नेटवर्कमध्ये (सीडीएन) (CDN) बिघाड झाल्याने ही परिस्थिती उद्‍भविल्याचे सांगण्यात आले. येथील स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता ही सेवा खंडित झाली. (Worldwide Internet Connection Break for a While)

इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचा फटका फायनान्शिअल टाइम्स, गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन यांच्यासह अनेक मोठ्या वेबसाईट व पोर्टलना बसला. रेडिट, स्पुटीफाय, पेपल, शॉपिफाय या लोकप्रिय वेबसाइटही यामुळे बंद पडल्या होत्या.

Internet
VIDEO: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूल मॅक्रॉन यांना लगावलं कानशीलात; व्हिडीओ व्हायरल

‘सीडीएन’ हा इंटरनेटच्या पायाभूत सुविधांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे. फास्टली सारख्या कंपन्यांनी जागतिक पातळीवर सर्व्हरचे नेटवर्क तयार केले आहे. त्यांच्यामार्फत ते सेवा पुरवितात. स्थानिक ‘सीडीएन’वरील माहिती गोळाकरून ती जागतिक पातळीवर प्रसारित करण्याचे काम फास्टली सारख्या कंपन्यांचे सर्व्हर करतात.

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार ॲमेझॉन आणि ट्विच यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या वेबसाइटसह ब्रिटिश सरकारच्या वेबसाइटनाही इंटरनेट ठप्पचा फटका बसला. या सर्व वेबसाइटवर ‘एरर ३०३ सर्व्हिस अनअव्हेलेबल’ असा संदेश दिसत होता.

कशामुळे ही समस्या निर्माण झाली याबाबत लगेच काही सांगणे शक्य होणार नाही. सायबर हल्ल्यामुळे हा प्रकार घडला आहे का, याबाबतही आता सांगता येणार नाही. परंतु, ही समस्या तातडीने सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ‘फास्टली’ कंपनीने म्हटले आहे. साधारण तासाभराने ही सेवा हळूहळू पूर्ववत झाल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com