esakal | व्यापारी संघर्षात जग गमावणार 585 अब्ज डॉलर!
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापारी संघर्षात जग गमावणार 585 अब्ज डॉलर!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात वर्षभरापासून चीनबरोबर सुरू असलेल्या व्यापारयुद्धाला अल्पविराम दिला. दोन्ही देश व्यापारयुद्धाच्या संदर्भात पुन्हा चर्चा सुरू करणार आहेत. दुसरीकडे जागतिक मंदीसंदर्भात जगभरातच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जगातील नऊ मोठ्या अर्थव्यवस्था चीन, इंग्लंड, जर्मनी, रशिया, सिंगापूर, ब्राझील, फ्रान्स, जपान या एकतर मंदीच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत किंवा मंदीचा सामना करत आहेत.

व्यापारी संघर्षात जग गमावणार 585 अब्ज डॉलर!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात वर्षभरापासून चीनबरोबर सुरू असलेल्या व्यापारयुद्धाला अल्पविराम दिला. दोन्ही देश व्यापारयुद्धाच्या संदर्भात पुन्हा चर्चा सुरू करणार आहेत. दुसरीकडे जागतिक मंदीसंदर्भात जगभरातच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जगातील नऊ मोठ्या अर्थव्यवस्था चीन, इंग्लंड, जर्मनी, रशिया, सिंगापूर, ब्राझील, फ्रान्स, जपान या एकतर मंदीच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत किंवा मंदीचा सामना करत आहेत.

अर्थतज्ज्ञांच्या मते, अमेरिकासुद्धा लवकरच मंदीच्या तडाख्यात सापडणार अशी भीती वाटते आहे. अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांच्या एका गटाच्या अहवालानुसार 2021 पर्यंत अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या तडाख्यात सापडलेली असेल. अमेरिका-चीन व्यापरयुद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम खूप मोठ्या स्वरूपाचा असेल.

व्यापारयुद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेमुळे 2021मध्ये जागतिक जीडीपीमध्ये 0.6 टक्‍क्‍यांची घट होणार आहे. व्यापारयुद्धामुळे 2021 मध्ये 97 ट्रिलियन डॉलरच्या जागतिक अर्थव्यवस्थेला बसणारा फटका हा तब्बल 585 अब्ज डॉलर इतका असेल. मंदीला तोंड देण्यासाठी अलीकडच्या काळात युरोप, भारतासह आशिया, ऑस्ट्रेलिया या देशांच्या मध्यवर्ती बॅंकांनी त्यांच्या व्याजदरात याआधीच कपात केली आहे.

एक गोष्ट मात्र नक्की आहे. ती म्हणजे अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापारयुद्धामुळे चीनला जास्त मोठा फटका बसणार आहे, तर अमेरिकेचेही उत्पादन 0.6 टक्‍क्‍यांनी घटणार आहे. चीनच्या जीडीपीमध्ये 1 टक्‍क्‍याने घट होईल.

loading image