स्वीडनमध्ये अनुभवा बर्फाचे हॉटेल..

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

जॅकसजार्वी (स्वीडन) - 'आइसहॉटेल 365' नावाचे जगातील पहिले संपूर्ण बर्फाचे हॉटेल सुरु होणार आहे. या हॉटेलमध्ये 55 खोल्यांची तर 20 डिलक्स सूट्सची सोय आहे. यासाठी टोर्न नदीचे 30,000 लीटर पाणी गोठविण्यात आले आहे. वर्षभर हा बर्फ गोठलेला असावा यासाठी 'सोलर पॉवर रेफ्रीजरेटींग सिस्टिम'चा वापर करण्यात आला आहे. 

हॉटेलच्या अधिकृत संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलचे काम 16 डिसेंबरला पूर्ण होणार असून, हॉटेलच्या उद्घाटनाला येणाऱ्या सर्वांच्या पाहूणचारासाठी सज्ज आहे.

या आइस हॉटेलमध्ये स्वत:ची बर्फाची शिल्पे बनविण्याचा, तसेच टोर्न नदीत पोहण्याचा आनंद ग्राहकांना घेता येणार आहे. या हॉटेलमधील आणखी एक आकर्षण म्हणजे 40 कलाकारांनी केलेल्या बर्फाच्या विविध कलाकृती. 

या हॉटेलच्या बांधणी विषयी, त्यातील बारकावे जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर, येथे हॉटेलचे डिझायनर्स, आर्किटेक्ट आणि बिल्डरला भेटण्याची संधी देखील मिळणार आहे.  

व्हिडिओ सौजन्य - Zricks.com youtube

Web Title: World's first permanent ice hotel to open in Sweden

व्हिडीओ गॅलरी