नाव वाचून लागेल धाप! जगातील सर्वात लांब नाव असलेली जागा माहितेय?

इंग्रजी भाषेतील सर्वात मोठ्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
worlds longest place name has 85 letters has very odd pronunciation
worlds longest place name has 85 letters has very odd pronunciation esakal
Summary

इंग्रजी भाषेतील सर्वात लांब स्थानाच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

प्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर (William Shakespeare) म्हणाले होते की, नावात काय असते? जर नाव इतके मोठे असेल की त्याला हाक मारणे कठीण जाते, तर ते महत्त्वाचे बनते. तुम्हालाही वाटत असेल ना, नावात काय आहे? तुम्हाला या नावामुळे जगभर प्रसिद्ध झालेली (world’s longest place name) अशी काही नावे ऐकल्यानंतर तुमचाही विचार बदलेल. न्यूझीलंडमध्येही अशा एका ठिकाणाचं नाव आहे, जिथे लिहिताना एखाद्याचे हात दुखेल आणि बोलायचं झालं तर जीभ अडखळेल.

न्यूझीलंडच्या (New Zealand) उत्तर बेटावर ‘टॉमेटा’माउंटन (Taumata Mountain) स्थित आहे, परंतु हे त्याचे लहान नाव आहे. त्याचे पूर्ण नाव इतके लांब आहे की इंग्रजी भाषेतील सर्वात मोठ्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंद झाली आहे. या नावात एकूण 85 अक्षरे आहेत. या नावामध्ये कोणत्याही प्रश्नाचे छोटे-मोठे उत्तरही तयार होईल. (worlds longest place name has 85 letters has very odd pronunciation)

worlds longest place name has 85 letters has very odd pronunciation
कुठं जाऊन झोपलेत बहिण-भाऊ, जीवाची काही पर्वाच नाही!

85 अक्षरांचे नाव वास्तविक टंगट्विस्टर

'टॉमेटा' नावाची टेकडी न्यूझीलंडच्या उत्तर बेटावर आहे आणि हे या ठिकाणाचे छोटे नाव आहे. या ठिकाणाच्या संपूर्ण नावावर एक विश्वरेकार्ड आहे. ज्याचा उच्चार ‘Taumatawhakatangihangakoauauotamateaturipukakapikimaungahoronukupokaiwhenuakitanatahu’ असा आहे. हे नाव पाहून तुम्ही कदाचित ते वाचण्याचा त्रासही घेणार नाही, पण कल्पना करा की इथे राहणारे लोक कोणत्याही अधिकृत कागदपत्रात गावाचे नाव लिहिण्याचा कंटाळा करतात. स्थानिक भाषेत माओरीमध्ये लिहिलेल्या या नावाचा अर्थ असा आहे - 'ज्या शिखरावर एक पर्वतारोहक, टमाटी नावाचा माणूस आपल्या प्रियजनांसाठी बासरी वाजवत होता'. या संपूर्ण नावात 85 अक्षरे असून या टेकडीची एकूण उंची 305 मीटर आहे.

worlds longest place name has 85 letters has very odd pronunciation
काय सांगता 'कोरोना वडा'! बनवणारा जोमात, पाहणारे कोमात

ऐतिहासिक नावाची टेकडी

पृष्ठभागापासून 1000 फूट उंचीवर वसलेल्या या टाऊनशिपमध्ये फारसे लोक राहत नाहीत. स्थानिक लोक या ठिकाणाला टॉमेटा किंवा टोमेटा हिल म्हणतात. या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव स्थानिक योद्ध्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे येथील लोकांसाठी ही अभिमानाची बाब आहे. त्याचप्रमाणे युरोप खंडातील सर्वात मोठे गाव वेल्समध्ये आहे, ज्याचे नाव आहे - ‘Llanfairpwllgwyngyllgogerychwyrndrobwllllantysiliogogogoch’. या नावात एकूण 58 अक्षरे आहेत. इतकेच नाही तर या ठिकाणच्या रेल्वे स्थानकाचे नाव देखील तेच आहे आणि ते सर्वात लांब नाव असलेले रेल्वे स्थानक देखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com