दारुपुढे चोराला कळाले नाही बाटलीचे महत्त्व

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

कोपनहेगन - दारूसाठी कोण किती खर्च करेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण 'वोडका'ची इतकी महागडी बाटली तुम्ही पाहिली नसेल. या बटलीवर हिरे आणि सोन्यानी डिझाईन केली आहे. त्यामुळे त्याची किंमत जवळपास साडेआठ कोटी एवढी आहे. ही बाटली कोपनहेगनच्या एका बारमधून चोरीला गेली होती. परंतु, नुकतीच एका बांधकामाच्या ठिकाणी ती रिकामी सापडली आहे. दारुपुढे चोराला या बाटलीचे महत्त्वच कळाले नसल्याने सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

डेन्मार्कच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कॅफे 33' येथून ही बाटली चारीला गेली होती. चोराने ही बाटली चोरल्यानंतर त्यातली दारु प्यायली बाटली फेकून दिली असवी. परंतु, बाटलीला काहीही झालेले नाही. त्यावरची डिझाईन आणि हिऱ्याचे डिटेलिंग व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

विविध प्रकारच्या वोडकाचे संग्रह करणारे आणि कॅफेचे मालक यांनी बाटली सापडल्याने आनंद व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी ''आय फील फेंटास्टिक, द वोडका गॉड सेव्ह अस'' म्हटले आहे. 

Web Title: World's most expensive bottle of vodka found empty following bar heist

टॅग्स