कुठे सापडलाय जगातला सर्वात जुना मोती ?   

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

या मोत्याची किंमत किती आहे याचा अजूनही खुलासा केलेला नाही. अबुधाबीमध्ये होणाऱ्या एका प्रदर्शनात ठेवला जाणार आहे. 

हिरे, मोती, माणिक, पाचू याबद्दल आपल्याला कायम प्रचंड आकर्षण असतं. अशातच तुमच्या हाती कळत-नकळत एखादा हिरा किंवा मोती हाती लागला तर ? कसलं भारी ना ? अशीच एक भन्नाट घटना संयुक्त अरब अमीरातीच्या अबुधाबीमध्ये घडलीये.

त्याचं झालं असं, संयुक्त अरब अमीरातीच्या अबुधाबीमध्ये पुरातत्त्व खात्याकडून खोदकाम सुरु होतं. हेच खोदकाम करताना पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांना तब्बल 8000 वर्ष जुना मोती सापडल्याची माहिती आहे. असं म्हणतात, हा मोती जगातील सर्वात जुना मोती आहे. 

खरतर असं म्हणतात सध्याच्या संयुक्त अरब अमीराती म्हणजेच UAE मध्ये प्राचीन काळात इथल्या समुद्र किनाऱ्यांवर मोती सापडायचे. याबद्दलचा उल्लेख त्या काळातील अनेकांनी केलाय. काही जाणकारांच्या माहितीनुसार प्राचीन इराकमध्ये हे मोती विकले जायचे. एकेकाळी अरब अमीरातची अर्थव्यवस्था ही मोत्यांच्या व्यवसायावर टिकून होती असं सांगितलं जातंय. 

No photo description available.

अशातच आता मारवाह या बेटावर आता खोदकाम करताना हा तब्बल 8000 वर्ष जुना मोती सापडलाय. या मोत्याची किंमत किती आहे याचा अजूनही खुलासा केलेला नाही. अबुधाबीमध्ये होणाऱ्या एका प्रदर्शनात ठेवला जाणार आहे. 

WebTitle : worlds oldest pearl found near abu dhabi 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: worlds oldest pearl found near abu dhabi