'या' उद्योगपतीनं अंबानींनाही मागं टाकलं; घरासाठी उधळले तब्बल...

वृत्तसंस्था
Thursday, 13 February 2020

165 मिलियन डॉलरला घेतली मालमत्ता विकत

- जूनमध्ये 80 मिलियन डॉलरची उधळपट्टी

- तब्बल 17000 स्केअर फुटांपर्यंत पसरली वास्तू

लॉस एँजेलिस : पैसा असाल की अनेक गोष्टी साध्य होतात. तो पैसा खर्च करताना आपण बहुतेकवेळा कसला विचारही करत नाही. असाच एक प्रकार लॉस एँजेलिस घडला. ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांनी लॉस एँजेलिस येथे एक वास्तू खरेदी केली. त्यासाठी त्यांनी तब्बल 165 मिलियन डॉलरची उधळपट्टी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेफ बेझॉस हे ऍमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीही (सीईओ) आहेत. त्यांनी लॉस एँजेलिस येथे एक वास्तू खरेदी केली. त्यासाठी तब्बल 165 मिलियन डॉलरची उधळपट्टी केली. त्यामुळे बेझॉस सध्या चांगलेच चर्चेत आहेत. याबाबतचे वृत्त 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिले आहे. 

'हे' ११ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत घरवापसी; गणेश नाईकांना मोठा धक्का..

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून जेफ बेझॉस यांचे नाव घेतले जाते. त्यांनी वॉर्नर इस्टेट खरेदी केली असून, ही जागा लॉस एँजेलिस येथील बेवेर्ली हिल्स येथे आहे. ही वास्तू (हवेली) 1930 मध्ये जॅक वॉर्नर यांनी बांधली. ही वास्तू 13600 स्केअर फुटांपर्यंत पसरली आहे. यामध्ये अनेक टेरेस, गार्डन, दोन गेस्ट हाऊस, स्विमिंग पूल आणि टेनिस कोर्ट आहे.

Image result for Jeff Bezos

165 मिलियन डॉलरला घेतली मालमत्ता विकत

बेझॉस यांनी तब्बल 165  मिलियन डॉलरला ही मालमत्ता विकत घेतल्याने लॉस एँजिलिस येथील ही सर्वात मोठी डील ठरली आहे. मागील सहा महिन्यात अशाचप्रकारची डील झाली होती. 

जूनमध्ये 80 मिलियन डॉलरची उधळपट्टी

तसेच जून 2019 मध्ये 80 मिलियन डॉलरची उधळपट्टी केली गेली. याबाबत वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत सांगितले, की पेंट हाऊस अपार्टमेंटमध्ये तीन मजले आणि खासगी लिफ्टही असणार आहे. 

Image result for jeff bezos house in los angelis

तब्बल 17000 स्केअर फुटांपर्यंत पसरली वास्तू

बेझॉस यांनी आणखी दोन घरे खरेदी केली असून, ते पेंटहाऊसच्या जवळ येते. या तीन भागात 12 बेडरूम्स आहेत आणि हे सर्व 17000 स्केअर फुटांवर पसरले आहे. ही डीलही न्यूयॉर्कमधील सर्वात महत्वाची डील समजली गेली आहे. 

Image result for Jeff Bezos

जगातील श्रीमंतांपैकी एक म्हणजे बेझॉस 

बेझॉस यांनी 4.1 बिलियन डॉलरला त्यांचे शेअर विकले. 7 फेब्रुवारीला बेझॉस यांनी 570 मिलियन डॉलरहून अधिक शेअर्स विकले. आता ते जगातील सर्वांत श्रीमंतांपैकी एक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worlds richest man Jeff Bezos splashes $ 165 million on a house