जगातील सर्वात उंच पूल वाहतुकीसाठी खुला 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

बेईपानजियांग : चीन हा देश अत्यंत महत्वाकांक्षी देश म्हणून जगभरात लोकप्रिय आहे. चीन देशाच्या नावे अशा वास्तू,शिल्प बांधण्याचे विक्रम आहेत. या लौकिकाला साजेशा गोष्टींमध्ये आता आणखी एक भर पडत आहे. चीनमधील युनाना-गीझू या दोन प्रांताना जोडणारा पूल आज वाहतुकीसाठी खुला केला आहे. 

या दोन्ही ठिकाणी पूर्वी पोहचण्यास चार तासांहूनही जास्त वेळ लागत असे,मात्र आता हे अंतर केवळ एक तासात करता येणे शक्‍य आहे. बेईपानजियांग नावाचा हा पूल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत उंच पूल आहे.अभियांत्रिकीचे आश्‍चर्यचकित करणारी अनेक उदाहरणे चीनमध्ये पाहायला मिळतात. प्रचंड धुक्‍यात हरवलेला, उंचीवर असलेला हा पूल गुरूवारी वाहतुकीसाठी नागरिकांना खुला करण्यात आला. काचेच्या पुलानंतर आता चीनमधला सगळ्यात उंच असा हा पूल आहे. बेईपानजियांग या पुलावर बघता बघता वाहनांनी गर्दी केली होती.

हा पूल जमिनीपासून एक हजार 854 फूट उंचीवर आहे. या पुलाची लांबी एक हजार 341 मीटर आहे. त्यामुळे जगातील सर्वात उंच पुलाच्या यादीत या पुलाचा सामावेश झाला आहे. चीनमध्ये जगातील पहिला उंच काचेचा पूल सप्टेंबरमध्ये पर्यटकांसाठी खुला केला होता. या काचेच्या पुलावर चालण्याचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी केल्यानंतर फक्त दोन दिवसांत सुरक्षेच्या कारणास्तव तो बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. आता हा पूल तरी किती दिवस खुला राहणार याविषयी अशी चर्चा रंगत आहे. 

Web Title: world's second longest span of this kind of bridge

टॅग्स