ब्रिटिश प्रसारमाध्यमांना रशियात प्रवेशबंदी!

युक्रेनचे युद्ध: संरक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांनाही मनाई
Wrong news about Russia in Ukraine war British media banned from entering Russia
Wrong news about Russia in Ukraine war British media banned from entering Russiasakal

मॉस्को : रशियाने ब्रिटनमधील अनेक माध्यमांना आणि संरक्षण क्षेत्राशी निगडित अनेक व्यक्तींना रशियात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. युक्रेन युद्धात रशियाबाबत चुकीचे वृत्त प्रसारित केल्याचा ठपका या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज ही घोषणा केली. त्यानुसार, ब्रिटिश माध्यमांमधील २९ पत्रकार आणि निवेदकांनी युक्रेनमधील रशियाच्या कारवाईचे चुकीचे चित्रण जगासमोर मांडल्याने त्यांना रशियात प्रवेश करण्यास मनाई केली जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ब्रिटिश पत्रकारांनी चुकीचे आणि एकतर्फी वार्तांकन करून ब्रिटनमधील नागरिकांमध्ये रशियाबद्दल चुकीचे चित्र उभे केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. प्रवेशबंदी केलेल्यांमध्ये बीबीसी, द टाइम्स आणि गार्डियन या माध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. याशिवाय, ब्रिटनमधील संरक्षण क्षेत्राशी संबंधित २० व्यक्तींनाही रशियात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. या व्यक्तींमध्ये नौदल प्रमुख, संरक्षण उपमंत्री, संरक्षण साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे प्रमुख यांचा समावेश आहे.

सिव्हिरोदोनेत्स्कवर रशियाचा ताबा

सुमारे महिनाभराच्या संघर्षानंतर युक्रेनच्या पूर्व भागातील सिव्हिरोदोनेत्स्क या शहराच्या बहुतांश भागावर रशियाच्या सैन्याने ताबा मिळविला आहे. काही ठिकाणी अद्यापही युक्रेनचे सैनिक चिवट प्रतिकार करत आहेत. या शहरातील अझोट रासायनिक प्रकल्पात अनेक नागरिक अडकून पडले आहेत. या प्रकल्पावर रशियाचा बाँबवर्षाव सुरु आहे.

युद्धाच्या आघाडीवर

  • जागतिक बाजारात अन्नधान्य महाग होण्यासाठी युद्धच कारणीभूत : नाटो

  • युक्रेनला आणखी शस्त्र पुरवठा करणार : ईयू

  • रशियावर आणखी निर्बंध घाला : व्होलोदीमिर झेलेन्स्की

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com