पाकच्या या दुर्दशेस शरीफच कारणीभूत: मुशर्रफ

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - जागतिक पातळीवर पाकिस्तान एकटा पडण्यास पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सरकारने राबविलेली चुकीची धोरणेच जबाबदार असल्याचे टीकास्त्र पाकचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी सोडले आहे. 

नवी दिल्ली - जागतिक पातळीवर पाकिस्तान एकटा पडण्यास पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सरकारने राबविलेली चुकीची धोरणेच जबाबदार असल्याचे टीकास्त्र पाकचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी सोडले आहे. 

जम्मु काश्‍मीर राज्यातील उरी येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात जागतिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. याशिवाय, पुढील महिन्यात (नोव्हेंबर) इस्लामाबादमध्ये होणारी सार्क परिषदही रद्द करण्यात आली आहे. शरीफ यांच्यावर देशांतर्गत दबावही वाढत आहे. पाकिस्तानमधील लोकप्रिय खेळाडू-राजकीय नेते इम्रान खान यांनीही काल (शनिवार) शरीफ यांचा "संपत्तीचा अविरत लोभ‘च पाकिस्तानच्या या अवस्थेस जबाबदार असल्याची परखड टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर, मुशर्रफ यांनी शरीफ सरकारवर सोडलेले टीकास्त्रही अत्यंत संवेदनशील मानले जात आहे. 

""या सरकारने आत्तापर्यंत 35 अब्ज डॉलर्स वापरले आहेत; आणि तरीही इतक्‍या संपत्तीमधून एकही फायदेशीर, मोठा प्रकल्प आकारास येऊ शकला नाही, ही खरोखरच आश्‍चर्याची बाब आहे. याउलट या सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे लोकांना प्रचंड त्रास होतो आहे,‘‘ असे मुशर्रफ म्हणाले. 

मुशर्रफ यांनी यावेळी भारतावरही टीका केली. "भारतामध्ये हल्ला झाला; की तो पाकिस्ताननेच घडविला असल्याची टीका करण्याची भारतास सवयच असल्याचे,‘ मत मुशर्रफ यांनी व्यक्त केले. याचबरोबर,"पाकिस्तानचा कारभार सुधारण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाण्याची इच्छा असली; तरीही सध्या तेथे जाऊन काहीही उपयोग होणार नाही,‘ असे मुशर्रफ यांनी सांगितले.

Web Title: 'wrong policies' reason for Pak's global isolation:Musharraf