काय सांगता! वुहान शहरातील वॉटर पार्कमध्ये हजारो चिनी नागरिकांची पार्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 17 August 2020

चीनच्या ज्या शहरातून कोरोनाचा प्रचार झाला होता, त्या शहरात जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे.

बिजिंग- कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. अनेक देश कोरोना विषाणू समोर हतबल झाले आहेत.  असे असताना चीनच्या ज्या शहरातून कोरोनाचा प्रचार झाला होता, त्या शहरात जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. वुहान शहरातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चिनी नागरिक एका वॉटरपार्कमध्ये  हजारोंच्या संख्येने जमा झाल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे लोक येथे शारीरिक अंतराचे पालन करताना दिसत नाहीत. शिवाय त्यांनी मास्कही वापरलेला नाही. 

रशियाच्या कोरोना लशीची पहिली बॅच तयार; चीननेही दिली 'गुड न्यूज'

Imageवुहान शहरातील प्रसिद्ध अशा माया वॉटरपार्कमध्ये नागरिक पार्टीसाठी जमले बोते. एकूण क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच पार्कमध्ये प्रवेश देण्यात आला होता. शिवाय लोकांनी पार्कमध्ये यावे यासाठी तिकीटावर मोठी सुट देण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते.  वुहान शहरातील पार्क जून महिन्यामध्ये पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. शहरात 76 दिवस कडकडीत टाळेबंदी करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने हळूहळू निर्बंध उठवले आहेत. 

मागील वर्षी डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर हा विषाणू जगभर पसरला. वुहान शहर हुबेई प्रांताची राजधानी आहे. शहराची लोकसंख्या 1.1 कोटी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शहराला पूर्णपणे बंद करण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणात चाचणी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर शहरात आणि चीनमध्ये कोरोना महामारी नियंत्रण्यात येताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येताना दिसत आहे. 

चंद्राबाबू नायडू यांचे नरेंद्र मोदी यांना पत्र; केला गंभीर आरोप

Imageहुबेई प्रांतात एप्रिल महिन्यामध्ये लॉकडाऊन उठवण्यात आला होता. कोरोना विषाणूला नियंत्रण्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पाऊलं उचलण्यात आली होती. त्यामुळे सध्या प्रांतामध्ये कोरोनाचा स्थानिक प्रचार थांबला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हुबेई सरकारने 400 पर्यटन क्षेत्रांसाठी फ्री-एन्ट्री जाहीर केली आहे. मात्र, सध्या तरी नागरिक याकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. 

दरम्यान, जगभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. अमेरिकासारख्या महासत्तेला या विषाणूने पुरते हैराण केले आहे. जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील असून तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारतात सध्या  एका दिवसात अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wuhan Water Park In China Thousands Without Masks Party