हाँगकाँगला स्वायत्तता, पण नियंत्रण चीनचेच - जिनपिंग

जिनपिंग यांचा इशारा; ‘एक देश, दोन यंत्रणे’ला समर्थन
xi jinping says hong kong experienced true democracy only after handover to china
xi jinping says hong kong experienced true democracy only after handover to chinasakal

हाँगकाँग : ‘एक देश, दोन यंत्रणा’ या आराखड्याला आपले समर्थन असल्याचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज स्पष्ट केले. हाँगकाँगला ५० वर्षे स्वातंत्र्याची आणि स्वायत्ततेची मुभा असताना चीन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांच्या टीकेला जिनपिंग यांनी याद्वारे उत्तर दिल्याचे मानले जाते. हाँगकाँगनेही चीनच्या नेतृत्वाचा आदर राखणे आवश्‍यक आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

ब्रिटनकडून हाँगकाँगचा ताबा चीनकडे आल्याच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिनपिंग यांनी ‘एक देश, दोन यंत्रणे’चे जोरदार समर्थन केले. १९९७ ला निश्‍चित झालेल्या या आराखड्यामुळे चीनचा भाग असूनही हाँगकाँगला ५० वर्षांपर्यंत स्वायत्तता आणि वेगळे सरकार मिळणार असल्याचे कबूल करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हाँगकाँगमधील चीनचा हस्तक्षेप वाढला असून येथील निवडणुकीच्या नियमांमध्येही त्यांनी बदल केला आहे. त्यामुळे ५० वर्षे पूर्ण होण्याआधीच चीनकडे हाँगकाँगचा संपूर्ण ताबा जाणार असल्याचा आरोप अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी केला होता. त्याला जिनपिंग यांनी आज उत्तर दिले.

आपल्या भाषणादरम्यान जिनपिंग म्हणाले,‘‘हाँगकाँग आणि मकाऊ यांना स्वायत्तता असली तरी त्यावर चीनचे नियंत्रण आहे. त्यामुळे हाँगकाँगनेही चीनच्या नेतृत्वाचा आदर करायला हवा. हाँगकाँगमधील घडामोडींमध्ये इतर देशांचा हस्तक्षेप आम्ही अजिबात सहन करणार नाही.’’ हाँगकाँगमध्ये जोपर्यंत चीन समर्थक सरकार आहे, तोपर्यंत या प्रदेशाची स्वायत्तता टिकून राहिल, असा इशाराही जिनपिंग यांनी दिला.

नव्या नेत्याचा शपथविधी

शी जिनपिंग यांच्या दोन दिवसांच्या हाँगकाँग दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत या शहराचे नवे प्रशासक जॉन ली यांचा शपथविधी झाला. २०१९ पासून हाँगकाँगमध्ये सुरु असलेले चीनविरोधी आंदोलन मोडून काढण्यात जॉन ली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com