दहशतवादी हल्ल्यात येमेनचे 15 सैनिक ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जानेवारी 2018

सरकारी अधिकाऱ्याच्या मते, या हल्ल्यामागे येमेनमधील सक्रिय अल कायदा संघटना जबाबदार आहे. गेल्या काही दिवसांपासून संयुक्त अरब अमिराती समर्थक सरकारी दलाने अल कायदाच्या ठिकाणांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे

एडन - येमेनच्या शाब्वा प्रांतात मंगळवारी सैनिकांच्या तपासणी नाक्‍यावर झालेल्या आत्मघाती स्फोटात 15 येमेन सैनिकांचा मृत्यृ झाला.

शाब्वा प्रांतातील नोखान परिसरात आत्मघातकी पथकातील हल्लेखोराने स्फोटाने भरलेल्या मोटारीसह स्वत:ला उडवले. त्यात 15 सैनिक जागीच ठार झाले. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली नाही. मात्र सरकारी अधिकाऱ्याच्या मते, या हल्ल्यामागे येमेनमधील सक्रिय अल कायदा संघटना जबाबदार आहे. गेल्या काही दिवसांपासून संयुक्त अरब अमिराती समर्थक सरकारी दलाने अल कायदाच्या ठिकाणांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर येमेनच्या दक्षिण प्रांतातील सुरक्षा दलाच्या चौक्‍यांवर सातत्याने हल्ले होत आहेत.

Web Title: yemen terrorism