ऑनलाइन शिकत असाल, तर देश सोडा!

वृत्तसंस्था
बुधवार, 8 जुलै 2020

कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे ज्यांचे शिक्षण ऑनलाइनच्या माध्यमातून सुरू असेल अशा अमेरिकेत शिकत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या-त्यांच्या देशात परतावे लागणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका दहा लाख विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यात सुमारे दोन लाख भारतीय विद्यार्थी आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्‍प यांच्या प्रशासनाने हा निर्णय सोमवारी (ता. ६) घेतला.

वॉशिंग्टन - कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे ज्यांचे शिक्षण ऑनलाइनच्या माध्यमातून सुरू असेल अशा अमेरिकेत शिकत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या-त्यांच्या देशात परतावे लागणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका दहा लाख विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यात सुमारे दोन लाख भारतीय विद्यार्थी आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्‍प यांच्या प्रशासनाने हा निर्णय सोमवारी (ता. ६) घेतला. अमेरिकेत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी ‘एफ-१’ आणि ‘एम-१’ या गटातील व्हिसा देण्यात येतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेच्या निर्णयाविषयी...
प्रश्‍न -  निर्णय काय आहे?
उत्तर -
 अमेरिकेत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ज्या परदेशी विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन भरत आहेत, त्यांना अमेरिका सोडावी लागेल. अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमा शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय घेण्यामागील कारण काय?
अमेरिकेतील कोरोनाव्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला. यामुळे आरोग्य सेवेवरील ताण कमी होऊन खर्चात बचत होईल, असा सरकारचा अंदाज असल्याचे ‘सीएनएन’ने म्हटले आहे.

सर्व परदेशी विद्यार्थ्यांना मायदेशात परतावे लागेल?
नाही. ज्यांचे वर्ग ऑनलाइन सुरू आहेत, त्यांनाच हा आदेश लागू होईल. अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालय किंवा विद्यापीठात जाणे आवश्‍यक नाही.

No photo description available.

जर एखादा विद्यार्थी मायदेशी परतला नाही तर?
जर एखादा परदेशी विद्यार्थी हा आदेश डावलून अमेरिकेतच राहिला तर तर त्याला जबरदस्तीने त्याच्या देशात पाठविले जाईल, असे ‘सीएनएन’ने सूत्रांच्या हवाल्याने स्पष्ट केले आहे.

सर्व परदेशी विद्यार्थी त्यांच्या देशांत परतू शकतील का?
‘सीएनएन’च्या तज्ज्ञांच्या मते असे होणे अवघड आहे. कारण कोरोनामुळे अनेक देशात आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी आहे. अशा देशांमधील विद्यार्थ्यांबाबत काय करायचे हे अद्याप निश्‍चित झालेले नाही.

या निर्णयाचा परिणाम कोणावर होईल?
अमेरिकेतील सुमारे दहा लाख परदेशी विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होईल. यात दोन लाखांपेक्षा जास्त भारतीय आहेत.

भारतीय विद्यार्थी मायदेशी कसे परतणार?
दुसऱ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना ‘वंदे भारत’ मोहिमेअंतर्गत देशात परत आणले जात आहेत. अमेरिकेच्या या निर्णयावर भारत सरकारने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

अमेरिकेत सर्व शिक्षण ऑनलाइन होणार का?
याबद्दलचे धोरण जाहीर झालेले नाही. हार्वर्ड विद्यापीठाने ४० टक्के विद्यार्थ्यांना वर्गांमध्ये येण्यास परवानगी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: you are learning online leave the country