'झिका'च्या धोक्‍याती तिव्रता घटली

पीटीआय
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

जिनेव्हा - लहान मुलांच्या डोक्‍यात आणि मेंदूमध्ये विकृती निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या झिका विषाणूची साथ आता जागतिक पातळीवर सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक नसल्याची घोषणा आज जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केली; मात्र असे असले, तरी "झिका'च्या साथीचा फैलाव रोखण्याचे आव्हान आजही कायम असल्याचे "डब्ल्यूएचओ'ने स्पष्ट केले आहे; मात्र असे असले, तरी "डब्ल्यूएचओ'चे म्हणणे मान्य करण्यास ब्राझीलने नकार दिला आहे.

जिनेव्हा - लहान मुलांच्या डोक्‍यात आणि मेंदूमध्ये विकृती निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या झिका विषाणूची साथ आता जागतिक पातळीवर सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक नसल्याची घोषणा आज जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केली; मात्र असे असले, तरी "झिका'च्या साथीचा फैलाव रोखण्याचे आव्हान आजही कायम असल्याचे "डब्ल्यूएचओ'ने स्पष्ट केले आहे; मात्र असे असले, तरी "डब्ल्यूएचओ'चे म्हणणे मान्य करण्यास ब्राझीलने नकार दिला आहे. या साथीच्या रोगामुळे आरोग्य आणीबाणी निर्माण झाली असल्याचे आमचे मत कायम असून, त्या पद्धतीनेच आम्ही ब्राझिलमध्ये उपययोजना सुरू ठेवल्या आहेत, अशी माहिती ब्राझीलचे आरोग्यमंत्री रिकार्डो बॅरोस यांनी सांगितले. ब्राझीलमधील तज्ज्ञांनीही "डब्ल्यूएचओ'च्या मतावर असहमती दर्शविली आहे.

झिकाच्या विषाणूच्या साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधातील लढा अनेक दिवस सुरू राहील; मात्र झिका विषाणूची साथ आता जागतिक पातळीवर सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक नाही, असे "डब्ल्यूएचओ'च्या आणीबाणी समितीचे अध्यक्ष डॉ. डेव्हिड हेयमन यांनी सांगितले. गर्भवतींसह अनेकांमध्ये झिकाचे अतिशय कमी प्रमाणात लक्षणे दिसून येतात. झिकामुळे नवजात बालकांचे डोके आणि मेंदूमध्ये विकृती तयार होतात. झिकाच्या साथीचा 2015च्या मध्यावर फैलाव झाल्यानंतर तब्बल पंधरा लाख नागरिकांना त्याची लागण झाली होती. ब्राझीलमधील नागरिकांना या विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. तसेच मागील वर्षीपासून झिकामुळे एक हजार सहाशे लहान बाळांमध्ये विकृती निर्माण झाल्या असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. फेब्रुवारी 2016मध्ये "डब्ल्यूएचओ'ने झिकाच्या साथीला जागतिक संकट म्हणून घोषित केले होते.

भारतालाही धोका
जागतिक लोकसंख्येपैकी तृतीयांश लोकसंख्येला झिकाची लागण होऊ शकते, असा अंदाज संशोधकांनी चालू वर्षीच्या सुरवातीलाच व्यक्त केला होता. आफ्रिका, आशियासह भारतालाही झिकाचा मोठा धोका आहे. एकट्या भारतात 12 लाख नागरिकांना या विषाणूची लागण होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. झिकाची साथ आता जागतिक पातळीवर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक राहिलेली नाही.

Web Title: zika virus declined