
निरोगी शरीरात त्याची फ्रिक्वेन्सी ही 6 ते 8 हर्झटस् इतकी असते, पण जसे आजार बळावतात, तसे त्या पेशी आपली नैसर्गिक फ्रीक्वेन्सी सोडून कोणत्या तरी दुसऱ्या फ्रिक्वेन्सीमध्ये कंप पावतात.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोक खूप विविध आजारातून जात आहेत. नेहमीचे कानी पडणारे आजार म्हणजे रक्तदाब, अर्थराइटिस, हृदयरोग आणि भारतातील नित्याचा आजार म्हणजे मधुमेह.
भारत ही मधुमेहाची राजधानी झाली आहे. जेथे मधुमेह आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या रोगाने मृत्यूचे प्रमाण 50 टक्के आहे, असा हा आजार सायलेंट किलर आहे. जो हळूहळू आपल्या शरीरातील अवयवांवर प्रभाव टाकून ते निकामी करतो. मधुमेह हा शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम करतो जसे मज्जासंस्था, हदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित, अंत:स्त्रावप्रणाली, परिघीय मज्जासंस्था, पचनसंस्था, दृष्टी, त्वचा आणि चयापचय. आता आपण परिघीय मज्जासंस्था (पेरीफेरीअल) ही 40 ते 50 टक्के बाधित होते. म्हणजे मज्जातंतूला हानी पोहचते आणि त्याला डिंबेटीक न्यूरोपथ्य असे म्हणतात. रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढल्यामुळे संपूर्ण शरीरातील मज्जातंतू बाधित होतात.
- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
मुख्यतः: पायातील असलेले मज्जातंतू. शरीरातील ज्या भागात मज्जातंतू बाधित झाले असतील त्या शरीरातील अवयवात त्याची लक्षणे दिसून येतात.वेदना, पाय दुखणे,पायातील शक्ती जाणे,पाऊले दुखणे,चालायला अडथळे, मुत्रमार्गात, पचनसंस्था, हदय इत्यादी म्हणजे शरीरातही कुठल्याही अवयवावर ही प्रभाव टाकू शकते, पण घाबरण्याचे कारण नाही. ज्या प्रमाणे खबरदारी घेण्यापेक्षा सावधगिरी बाळगणे चांगले त्याचप्रमाणे मधुमेह निरोपॅथीत रक्तातील साखरेचे प्रमाण जर आटोक्यात ठेवले, तर काळजी करण्याचे कारण नाही.
मधुमेह न्युरोपॅथीचे दोन प्रकार आहेत -
1) पेरिफेरीअल न्यूरोपॅथी
2) ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी
1) पेरिफेरीअल न्यूरोपॅथी : ही सर्वसाधारण रुग्णांमध्ये आढळते,यात सर्व प्रथम पायांवर परिणाम होऊ लागतो आणि नंतर हातांवर.पेरिफेरीअल न्यूरोपॅथीची लक्षणे साधारण रात्री दिसून येतात. जसे पायातील शक्ती जाणे, हालचाल करताना निर्बंध येणे, पायातील वेदना, शरीरातील तापमानाचे चढ उतार, पायाला मुंग्या येणे अथवा भाजल्यासारखे जाणवते. पायात क्रॅम्प येणे, त्वचेची संवेदनशीलता वाढते, स्नायूशिथिल होतात, रेप्लेक्स बंद होणे, तोल जाणे. काही वेळेला गंभीर असे परिणाम म्हणजे जसे पायाला अल्सर (व्रण) येतो वा पायाची हाडे, जॉइंट खूप दुखतात.
2) ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी : ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम ही हदय, पोट, मुत्राशय, आतडे आणि डोळे नियंत्रित ठेवते. त्यामुळे ऑटोनॉमिक न्यूरोपथीमध्ये हे शरीरातील अवयव बाधित होऊ शकतात.
- दिल्लीच्या प्रदुषणाचा फटका बसला जान्हवी आणि कार्तिकला!
ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीची लक्षणे : पोटाचे विकार, मुत्रमार्गातील विकार आणि संसर्ग, बद्धकोष्ठता अथवा अतिसार, मळमळ- उलटी, छातीत धडधड, काम भावनेचा अभाव, खूप वेळ एका जागी बसल्यामुळे अचानक रक्तदाब कमी होणे. मात्र, आपण एक ध्येय ठेवून काम केले, तर न्यूरोपॅथीने मधुमेह बरा होऊ शकतो.
उपचार दोन प्रकारे करता येऊ शकतात.
1) औषधे
2) फिसिओथेरपी विशिष्ट व्यायाम करून नियंत्रित झालेली शरीराची हालचाल नियमित होईल.
यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे ज्या प्रकारे आपण एखादे ध्येय निश्चित करतो काही गोष्टी मिळविण्याकरिता त्याचप्रमाणे या रोगावर एक योजना करून टप्प्याटप्प्याने मात केली पाहिजे. जसे -
1) व्यायाम करून स्नायू बळकट करणे
2) शरीराचा तोल नियंत्रित करणे
3) रुग्णाला रक्तातील साखरेचे असलेले प्रमाण वा त्याचे महत्त्व पटवून सांगणे की कसे व्यायामामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रित राहील
4) रुग्णाला एक सकारात्मकता देणे आणि त्याला एक निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करणे
5) यातनेतून पूर्ण बरे करणे.
- यामी झळकतीय टिकटॉकवर; व्हिडिओ बघाच!
कुठल्या प्रकारचे व्यायाम करावेत?
1) लवचिकतेसाठी स्नायू ताणने
2) दररोज 20 ते 30 मिनिटे चालणे
3) तोल नियंत्रित करणारे व्यायाम
दुखण्यापासून आराम देणारी एक नवी पध्दती म्हणजे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धती- मॅट्रीक्स रिथम थेरपी. ही अतिशय उन्नत तंत्रज्ञान वापरून बनवलेले मशिन आहे, जे इलेट्रोमॅग्नेटीक ओसिल्लेशन्स (तरंग) निर्माण करते. आपण जर आपल्या शरीरातील पेशी मिकॉस्कोपखाली पहिल्या तर एका विशिष्ट फ्रिकवेन्सीमध्ये त्यांचे कंपन होत असते. निरोगी शरीरात त्याची फ्रिक्वेन्सी ही 6 ते 8 हर्झटस् इतकी असते, पण जसे आजार बळावतात, तसे त्या पेशी आपली नैसर्गिक फ्रीक्वेन्सी सोडून कोणत्या तरी दुसऱ्या फ्रिक्वेन्सीमध्ये कंप पावतात. त्यामुळे खूप वेदना होतात व जिथे शरीरात अनियमितता आहे त्या जागी खूप दुखते. त्यावेळेला त्यांचा समन्वय कायम ठेवण्यासाठी बाहेरून कंप देऊन पार (6-8) हर्झटस्वर परत आणता येतात.
याचे परिणाम खूप चांगले येत आहेत आणि खूप रुग्णांना याचा 100 टक्के फायदा हा पूर्ण वेदना जाऊन झाल्या आहेत. साधारण एका मॅट्रिक्सची सेटींगमध्ये शरीरातील दुखणाऱ्या अवयवावर 30 ते 45 मिनिटे ऑस्किललाशन्स दिली जातात व लगेचच पहिल्या दिवशी फरक जाणवायला सुरवात होते. साधारणतः: तीन ते चार सेटींगनंतर वेदना पूर्णपणे थांबते.
- लग्नाच्या पहिल्या वाढदिवसासाठी रणवीरने केली खास तयारी, पाहा फोटो!
मॅट्रिक्स रिथम उपचार पद्धतीचे फायदे :-
1) रक्ताभिसरण वाढते
2) लवचिकता वाढण्यास मदत होते
3) मज्जातंतूची सूज कमी होते व लवचिकता येते
4) वेदना खूप प्रमाणात कमी होतात
औषधे, आहार आणि नियमित व्यायामाने मधुमेह आटोक्यात ठेवू शकतो व सामान्य जीवन जगू शकतो.