सुनेचे सासुला मासिक पाळीवरून खणखणीत पत्र, वाचून तुमचेही डोळे उघडतील!

doughter in law writes a latter to mother-in-law's from menstruation it will open your eyes too!
doughter in law writes a latter to mother-in-law's from menstruation it will open your eyes too!

प्रिय सासूबाई,
सप्रेम नमस्कार,
आई ,आज जर मी हे पत्र लिहायचं धाडस नसत ना तर मी आणि आपल्या आजूबाजूच्या स्त्रिया अशाच जखडून राहतील.

आई ,
मी नव्याने लग्न करून आपल्या घरी आले.
खूप जोशात स्वागतही झाले. मला खूप छान वाटलं.
पण त्यानंतर माझी पाळी आली तेव्हा मला वेगळं बसायला सांगतलं मला वाईट वाटलं.
नवी नवरी होती मी त्यामुळे प्रतिउत्तर तरी कसं देऊ कळत नव्हत.
घरी आईला सांगितलं तर ती पण म्हणाली की सासरी जसं असेल तसं करावं लागेल. त्या क्षणी मला खूप एकट वाटलं की ना मी आता माहेरचे ना सासरचे. कायम तत्व, क्रांतीआणि हक्काच्या गोष्टी करणारी मी कशी काय कमजोर पडली. आज मी स्वतासाठी लढली नाही. माझा माझ्यावरच विश्वास बसे ना .

खरं आहे. एकदा लग्न झालं की मुलीचं तोंड आपोआपच बंद होतं. कारण तिच्या अस्तित्वाची लढाई सुरू होते. त्या दिवशी राम (माझा नवरा) त्याला हा प्रकार सांगतला आणि त्याला म्हणाले की

"लग्नापूर्वी तू तर बोलला होतास की पाळीचं कोणी काही बोलणार नाही. तुला मग आज मला का वेगळं बसवलं जातं आहे. तर तो म्हणाला कशाला लहान सहान गोष्टीला मोठं करतेस."

मला नवलच वाटलं. पाळी ही ऐवढी शुल्लक गोष्ट आहे का?...आई त्यानेही समजून नाही घेतलं. शब्द फिरवलेत. नव्या नवरीला पाहायला म्हणून गावातील काही मंडळी आणि नातलग आले तर चक्क त्यांना सांगण्यात आले की नवरीला कावळा शिवलाय.

एकीकडे म्हणायचं की पाळी ही अश्लील गोष्ट आहे आणि दुसरीकडे गावभर गाजावाजा, हे कितपत योग्य आहे?

आई तुम्ही पण एक स्त्री आहात ना. मग अस का करता?

लोणचं ,पापड खाऊ नकोस.. कुठे पाण्याला स्पर्श झाला तर गोमूत्र शिपडता. झाडांना पाणी देऊ देत नाही. चक्क मोठ्या जाऊबईना त्यांच्या मुलाला स्तनपान ही करू देत नाही. काय वाटत असेल त्या आईला तिच्या लेक्रविना?

आई मला खूप आदर आहे. तुम्ही सरपंच असल्याचा,आपल्या घराचा, माणसांचा, परंपरांचा सुध्दा.

मासिक पाळी सारख्या पवित्र गोष्टीला जर अश्लील म्हणत असाल तर कसं सहन करायचं..मला अभिमान आहे की या पाळीमुळे मला मातृत्व लाभणार. कधी स्पष्ट पने सांगता आल नाही तुम्हाला म्हणून पत्राद्वारे सांगतेय.

शेजारच्या अनिताला मुल नाही होत म्हणून केवढा छळ होतो तिचा, सगळे बोलत असतात तिला,तिची चूक काय? म्हणजे पाळी आली तर अशी वागणूक द्यायची आणि मुल नाही होत असलं तरीही वाईट वागणूक द्यायची. सगळीकडून स्त्रीचा दोष. तिने करावं तरी काय?

पाळीमुळे होणाऱ्या शारीरिक त्रासाने आधीच मी थकले असते आणि हा सगळा मानसिक त्रास नाही करू शकत सहन. नॅपकिन वापरावं तरी कचरा कुंडीत वेगळी पिशवी बांधून पण तुम्ही टाकू देत नाहीत. काय तर घंटा गाडीवाला पुरुष आणि शेजारी काय म्हणतील?
पाळीचा कपडा ऊन्हात सुकवू तरी द्या. कौलारू छापरमध्ये कोंबून वास सुटलाय त्याला आता.. आई माझी विनंती आहे तुम्हाला, माझ स्त्री पण हिरावून नका घेऊ. हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे... तुम्ही मला समजून घ्याल ही खात्री आहे. धन्यवाद!


तुमची मुलगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com