अ‍ॅसिडीटीने हैराण आहात? मग आवर्जून वाचा...

अ‍ॅसिडीटीने हैराण आहात? मग आवर्जून वाचा...

- सायली जोशी-पटवर्धन

अ‍ॅसिडीटी हा शब्द आपण बरेचदा अनेकांच्या तोंडी ऐकतो. अॅसिडीटी झाल्याने मग डोकेदुखी, मळमळ, पोट जड झाल्यासारखे वाटणे अशा तक्रारी उद्भवतात. जोपर्यंत हे आम्ल शराराच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत मात्र जीव घाबरा होऊन जातो. मग ही अॅसिडीटी कमी होण्यासाठी कोणी वेगवेगळ्या गोळ्या घेतात. तर कोणी घरगुती उपाय करुन ती कमी करण्याचा प्रयत्न करतात. हे करुनही त्रास कमी झाला नाही तर काही वेळा डॉक्टरांकडे जाण्याचीही वेळ येऊ शकते. याचाच पुढचा प्रकार म्हणजे हायपर अॅसिडीटी. सातत्याने हा त्रास होत असेल तर मात्र व्यक्तीला आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते, असाच सल्ला डॉक्टरही देताना दिसतात.

त्यामुळे जीवनशैलीतील थोडे बदल अॅसिडीटीपासून आपली सुटका करु शकतात. यासाठी आवश्यकता आहे ती अॅसिडीटी होण्याची कारणे, ती होऊ नयेत म्हणून जीवनशैलीत आणि मुख्यत: आहारात कोणते बदल करायला हवेत हे समजून घेण्याची. यामुळे आपला आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींना होणारा त्रास नक्कीच वाचू शकतो. जीवनशैली योग्य नसेल तर अ‍ॅसिडीटी ही कोणत्याही वयात, कोणत्याही वेळेला तुम्हाला सतावू शकते. तेव्हा अपुरी झोप, जेवणाच्या वेळा, जेवणातील घटक, फास्टफूडचे अतिसेवन, व्यसनाधीनता, मानसिक ताण या जीवनशैलीशी निगडीत गोष्टींकडे वेळीच पुरेसे लक्ष देणे आवश्यक आहे.

अ‍ॅसिडीटी म्हणजे काय?

आपल्या जठरात एक पाचक रस तयार होत असतो. तो अ‍ॅसिडिक म्हणजे आम्लयुक्त असतो. आपण खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी या पाचक रसाची शरीराला आवश्यकता असते. हा पाचक रस शरीरात योग्य़ प्रमाणात गरजेचा असतो, तो जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा अवेळी तयार झाला तर आम्लपित्ताचा म्हणजेच अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो.

अ‍ॅसिडीटीने हैराण आहात? मग आवर्जून वाचा...
साताऱ्यात अतिवृष्टीचे 10 बळी, मातीच्या ढिगाऱ्यांखाली अडकले 31 जीव

अ‍ॅसिडीटीची कारणे

१. रात्री उशीरा जेवणे आणि त्यानंतर लगेच झोपणे.

२. मानसिक ताणतणाव

३. अपुरी झोप

४. जेवणाच्या बदलत्या वेळा

५. आहारात मसालेदार पदार्थ व तेलाचा अतिवापर

६. भूक नसताना खाणे

७. चहा कॉफीचे अतिसेवन

८. सततचे औषधोपचार

९. आहारात प्रथिनांची कमतरता

१०. व्यसनाधिनता

या गोष्टींवर नियंत्रण ठेवले आणि योग्य ते बदल केल्यास अॅसिडीटीचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होते. योग्य आहाराबरोबरच व्यायाम करणेही तितकेच आवश्यक आहे. तसेच चहा, कॉफी घेण्याची सवय, व्यसने यांचा अतिरेक टाळायला हवा. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती क्षीण होते, त्यावेळी हलका आणि ताजा आहार घेणे अतिशय आवश्यक आहे.

आहारात कोणते बदल कराल?

१. आहारात दूध, दही यांसारख्या थंड पदार्थांचा समावेश करावा

२. जास्त काळ भूक न मारणे

३. आहारात प्रथिने आणि कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असतील याची काळजी घेणे

४. ज्वारी, नाचणी, बाजरी यांचा आहारात समावेश वाढविणे

५. जेवणाच्या वेळा बदलणार नाहीत याची काळजी घेणे

६. घरात केलेल्या अन्नाचे जास्तीत जास्त सेवन करणे

७. फळे, हिरव्या पालेभाज्या, सॅलाड यांचा आहारात समावेश करणे

८. मसालेदार आणि तिखट पदार्थांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करणे

९. कडधान्ये, डाळी यांचा आहारात पुरेसा वापर करावा

१०. जंकफूड, पॅकेज फूड कमीत कमी खावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com